Election results 2019: अमरावतीत नवनीत राणांचा अडसुळांना धक्का

अमरावती मतदारसंघात शिवसेनेने आनंदराव अडसुळ यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Updated: May 23, 2019, 07:44 PM IST
Election results 2019: अमरावतीत नवनीत राणांचा अडसुळांना धक्का title=

अमरावती : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने देशात आणि राज्यात शानदार कामगिरी केली आहे. असं असलं तरी त्यांना विदर्भात दुसरा धक्का लागला आहे. अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला. हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.

अमरावती मतदारसंघात शिवसेनेने आनंदराव अडसुळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. आनंदराव अडसुळ यांचा सामना महाआघाडीतला घटकपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांच्यात झाला. वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे निवडणुकीच्या रिंगणात होते.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये अमरावतीतून शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा यांनी नवनीत राणा यांचा १,३७,९३२ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

आनंदराव अडसुळ शिवसेना ४,६७,२१२
नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस ३,२९,२८०
गुणवंत देवपारे बसपा ९८,२००
राजेंद्र गवई आरपीआय ५४,२७८
राजू सोनोने अपक्ष १०,०५२

२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव