यवतमाळ : यवतमाळ-वाशिमचा गड राखण्यात शिवसेनेच्या भावना गवळींना यश आलं आहे. भावना गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा पराभव केला आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्यात सामना रंगला. वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण पवार यांना उमेदवारी देण्यात आली.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा ९३,८१६ मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
भावना गवळी | शिवसेना | ४,७७,९०५ |
शिवाजीराव मोघे | काँग्रेस | ३,८४,०८९ |
बळीराम राठोड | बसपा | ४८,९८१ |
राजू पाटील | मनसे | २६,१९४ |
मोहन राठोड | बीबीएम | २२,१६३ |