राजकीय विश्वातून सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट
Sharad Pawar Book Lok Maze Sangati : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' पुस्तकातून अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फूस लावल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीचे पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार आणि राजभवनाचा रडीचा डाव असल्याचे वक्तव्य या पुस्तकात करण्यात आले आहे.
अजित पवार यांचे पाऊल चुकीचे
आत्मचरित्रातून शरद पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पहाटेच्या शपथविधीने अजित पवार यांचे पाऊल चुकीचे असल्याचा उल्लेख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संवादातील सहजता बोलताना जाणवत नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती यामुळे भेटायला वेळ ठरवावी लागत होती. महविकस आघाडी कोसळण्यापूर्वी निर्माण झालेला पेच आणि त्यांनी पहिल्या टप्प्यात माघार घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत वादळ येईल, याचा मला अंदाज नव्हता.दरम्यान, असंतोष उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्त्व कमी पडले आहे, असेही पवार यांनी या पुस्तकात म्हटलेय.
पुस्तकात सध्याच्या अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य
शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. महाविकास आघाडीच्या जुळणीबाबत पवार यांनी या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 मधील घडामोडींवर पवारांनी थेट भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, शिवसेना संबंधांवर पवार यांनी हे भाष्य केले आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली यावर पवारांनी प्रथमच भाष्य केले आहे. आज या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीचं प्रकाशन होणार आहे. या आवृत्तीत सध्याच्या अनेक राजकीय घडामोडींवर पवारांनी भाष्य केले आहे. काय आहे या पुस्तकात याची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी का केला? शरद पवारांचा सल्ला घेतला होता का? याची उत्तर आज सर्वांनाच मिळणार आहेत. कारण शरद पवारांचं आत्मचरित्र लोक माझे सांगातीमध्ये याची उत्तरं असल्याची माहिती 'झी 24 तास'च्या हाती आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेना का सोडली? सत्तेत असूनही शिवसेनेत बंडाळी झाली का? शेवटच्या क्षणापर्यंत भाजपची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु होती का, या प्रश्नांचीही उत्तरं शरद पवार यांच्या आत्मचरित्रातून मिळणार आहेत.
लोक माझे सांगातीमध्ये 'या'वर राजकीय भाष्य
- अजित पवार यांनी का केला पहाटेचा शपथविधी?
- शरद पवार यांचा घेतला होता सल्ला?
- एकनाथ शिंदे यांनी का सोडली शिवसेना?
- शिवसेनेत का झाली बंडाळी?
- शेवटच्या क्षणापर्यंत भाजपची राष्ट्रवादीसोबत चर्चा?
या सर्व प्रश्नांची उत्तरं शरद पवार यांचे आत्मचरित्र लोक माझे सांगातीमध्ये समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजकीय विश्वातून मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट