Venomous Cobra In Helmet See What Happens: सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. थंडीच्या दिवसात सामान्यपणे पार्क केलेल्या वाहनांमध्ये ऊब मिळवण्यासाठी अनेक लहान-मोठे प्राणी आश्रय घेतात. अशाचप्रकारे हेल्मेटमध्ये लपलेल्या एका छोट्या आकाराच्या किंग कोब्रा प्रजातीच्या सापाने दुकाचीस्वाराला दंश केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या सापाला सर्पमित्राच्या मदतीने हळूच बाहेर काढण्यात आलं. दक्षिण भारतामधील एका शहरात हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती ग्लानी येऊन तिच्या दुचाकीवर मानखाली घालून बसल्यासारखी दिसत आहे. या व्यक्तीला इतर लोक शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेरपर्यंत हा व्यक्ती स्कूटरवरुन उठत नाही तर त्याला बेशुद्धावस्थेत त्याला उचून घेतात आणि ओमनी कारच्या रुग्णवाहिकेमधून घेऊन जाताना दिसतात.
मनोज शर्मा नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना, "हा दक्षिण भारतामधील व्हिडीओ आहे. कोब्रा सापाचं पिल्लू हेल्मेटमध्ये लपलं होतं. त्याने चालकाच्या डोक्यावर दंश केला," असा दावा केला आहे. तसेच पुढे, "जेव्हा तुम्ही हेल्मेट घालता तेव्हा एकदा त्यावर थाप मारुन आणि ते झटकून घ्या," असा सल्लाही मनोज शर्मा यांनी दिला.
या व्हिडीओमध्ये नंतर हेल्मेटमध्ये लपलेलं कोब्रा सापाचं पिल्लूही दाखवण्यात आलं आहे. सापाची पिल्लं कशाप्रकारे हेल्मेटमध्ये लपतात हे यामधून दाखवण्यात आलं आहे.
यह दक्षिण भारत का वीडियो है एक कोबरा का बच्चा हेलमेट में छुपा हुआ था और व्यक्ति के सर में काट लिया !!
जब भी आप हेलमेट पहने तो एक बार हेलमेट को ठोक कर झाड़ कर ही पहने !!#ViralVideos #Helmet #Viral pic.twitter.com/8PnRKdMXjo— (@ManojSh28986262) December 24, 2024
आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तरुणाचं काय झालं याची माहिती समोर आलेली नाही. 'झी 24 तास'ने या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. यामधील माहितीची आम्ही पुष्टी करत नाही. अशाप्रकारची घटना यापूर्वी केरळमध्ये ऑक्टोबर 2023 मध्येही घडली होती. त्यावेळी सोजन नावाचा व्यक्ती थोडक्यात बचावला होता. गॅरेजजवळ सोजनने ठेवलेल्या हेल्मेटमध्ये काहीतरी हलचाल करत असल्याचं त्याला दिसलं. त्याला हेल्मेटमध्ये साप लपला असल्याची शंका आली. त्यानंतर त्याने वनखात्याला कळवलं असता त्यांनी एक सर्पमित्र पाठवला. त्याने या हेल्मेटमधून दोन महिन्यांचं छोटं कोब्रा सापाचं पिलू बाहेर काढलं होतं.
हेल्मेट किंवा दुचाकीच्या चाकांबरोबरच हॅण्डल किंवा अन्य भागात आश्रय घेणारे हे साप दिसायला छोटे असले तरी अत्यंत विषारी असतात. म्हणूनच अशाप्रकारे ठेवलेलं हेल्मेट घालताना ते एकदा तपासून घेतलं पाहिजे.