नाशिकमध्ये अप्सरांचा रॅम्प वॉक; फॅशन शो पाहायला साधू महंतांची उपस्थिती

स्वर्गातील अप्सरानी रॅम्प वॉक करत श्रुंगार रसाची अनुभूती दिली

Updated: Oct 31, 2022, 12:44 PM IST
नाशिकमध्ये अप्सरांचा रॅम्प वॉक; फॅशन शो पाहायला साधू महंतांची उपस्थिती title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मंदिरांची (Temple) नगरी असलेल्या नाशिकमध्ये (Nashik) रविवारी रात्री इंद्राच्या दरबारातील अप्सरा (Apsara) अवतरल्या होत्या. नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत असलेल्या उर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा यांच्यासह अनेक स्वर्गातील अप्सरानी रॅम्प वॉक (Ramp Walk) करत श्रुंगार रसाची अनुभूती दिली. या रॅम्प वॉकमध्ये हिंदू पुराणकथा, वेद, महाकाव्यात या अप्सरां कशा असतील त्याची कल्पना करत वेशभूषा आणि मेकपची रचना करण्यात आली होती. अंगभर पूर्ण कपडे असलेल्या भारतीय वस्त्र प्रवरणातील हा अनोखा फॅशन शो बघण्यासाठी साधू महंतांची उपस्थित होती. त्यांच्या इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ब्युटीच्या (IBT) या उपक्रमाची आज सर्वत्र चर्चा आहे

पुराणानुसार शृंगाररस हा देवी देवतांनाही सुटला नाही व त्या शृंगार रसाने पुराणानुसार ज्या सर्वोच्च सौंदर्यवती आहेत त्या म्हणजे अप्सरा. अशा पवित्र संकल्पनेतून या फॅशन शो मध्ये अप्सरांचे अवतरण करण्यात आले. धर्म शास्त्रातील विषेश मार्गदर्शन महंत अनिकेतशास्त्रींचे लाभले. पुराणानुसार कश्यप ऋषींच्या बारा पत्नींपैकी मुनी ही पत्नी या अप्सरांची माता असल्याचे दाखले दिले जातात.

हिंदू पुराणकथा, वेद, महाकाव्ये व नाट्यशास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे 

अद्रिका, अल्मविशा, अंबिका, अन्वद्या, अनुचना, अरूणा, असिता, बुदबुदा, देवी, घृताची, गुणमुख्या, गुणवरा, काम्या, कर्णिका, केशिनी, क्षेमा, चित्रलेखा, लता, लक्ष्मणा, मनोरमा, मरिची, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, पूर्वचित्ती, रक्षिता, रंभा, रितुशाला, सहजन्या, समिची, सौदामिनी, सौरभेदी, शरद्वती, शुचिका, सोमा, सुवाहू, सुगंधा, सुप्रिया, सुरजा, सुरसा, सुरता, सुलोचना, तिलोत्तमा, उमलोचा, उर्वशी, वपु, वर्गा, विद्युत्पर्णा आणि विश्वची, या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो.

भाग्यश्री देशपांडे-धर्माधिकारी यांच्या इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ब्युटीतर्फे (IBT) फॅशन शास्त्र 2022 मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विषेश उपस्थिती नाशिकचे खासदार  हेमंत गोडसे, तसेच मनसेच्या रिटा गुप्ता व माजी स्थायीसमिती सभापती माजी नगरसेवक रमेश धोंगडे, कर्नल अशोक मजुमदार यांच्यास मान्यवर आणि दोन ते अडीच हजारांचा प्रेक्षक उपस्थित होते.