भाजपविरोधात आमची लढाई , काँग्रेसची सत्ता येईल - सोनिया गांधी

भाजपविरोधात आमची लढाई सुरुच राहिल. पु्न्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Updated: Aug 13, 2014, 02:40 PM IST
भाजपविरोधात आमची लढाई , काँग्रेसची सत्ता येईल - सोनिया गांधी title=

नवी दिल्ली : भाजपविरोधात आमची लढाई सुरुच राहिल. पु्न्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी  व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मागील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) योजनांचीच कॉपी केली आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर जातीय दंगलीमध्ये वाढ झाली आहे, याच पुनरुच्चार केला आहे. केंद्र सरकार समाजात फुट पाडण्याचे राजकारण करत आहे. लोकसभेत झालेल्या पराभवावर विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीला आम्ही एकत्रपणे सामोरे जाणार आहोत. लोकसभेत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संघर्ष करावा लागणार आहे. पण, आम्ही राज्यसभेत पुरेसे संख्याबळ असल्याने सरकारविरोधात आवाज उठवू, असा इशारा भाजपला त्यांनी दिला.

केरळमध्ये केंद्र सरकारवर सोनिया गांधी यांनी हल्लाबोल केला होता. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी मोदी सरकारला टार्गेट केले आहे. दरम्यान, काँग्रेस खासदारांनी आज संसदेत प्रश्नोत्तराचा तास रद्द करून जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.