Election results 2019 : दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
दक्षिण मुंबईतील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबई: शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यातील लढतीमुळे दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुलाबा, नरिमन पॉइंटचा उच्चभ्रू परिसर ते वरळी, शिवडीपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अरविंद सावंत यांना मतदारसंघातील विकासाचे प्रश्न मार्गी लावता आले नव्हते. त्यामुळे यंदाची लढत त्यांच्यासाठी काहीशी अवघड मानली जात आहे. भाजपशी युती झाल्यामुळे अरविंद सावंत यांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी त्यांची मुख्य भिस्त मराठी, गुजराती-मारवाडी-जैन मतदारांवर आहे.
तर दुसरीकडे मिलिंद देवरा यांनाही राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी पर्यूषण पर्वात मांसाहाराचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्याची भाषा करत जैन मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला होता. हे भावनिक आवाहन यशस्वी ठरल्यास जैन मतदार काँग्रेसकडे वळू शकतो. याशिवाय, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना दिलेला पाठिंबाही चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे कुलाबा, नरिमन पॉईंट या भागातील उच्चभ्रू मतदारही देवरा यांच्या पाठिशी उभा राहू शकतो.
लाईव्ह अपडेटस्
* दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
* दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत ९६८६५ मतांनी आघाडीवर
* अरविंद सावंत यांना ४,११,९१३ मते तर मिलिंद देवरा यांना ३,१५,०४८ मते
* अरविंद सावंत ५४४२३ मतांनी आघाडीवर
* दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंत यांच्याकडेच राहण्याची शक्यता; ४२ हजार मतांची आघाडी
* दक्षिण मुंबईत अरविंद सावंत २३७४३ मतांनी आघाडीवर
* दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांना २८,७२० तर मिलिंद देवरांना १२,८१६ मते
* दक्षिण मुंबईत पहिल्या फेरीत अरविंद सावंत यांना ९५७८ आणि मिलिंद देवरा यांना ४२४४ मते
* दक्षिण मुंबईत पहिल्या फेरीत अरविंद सावंत यांची आघाडी
* थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात