Election results 2019: गडचिरोलीत भाजपची काँग्रेसवर मात
गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली होती.
गडचिरोली : गडचिरोली-चिमुर मतदारसंघातून भाजपच्या अशोक नेते यांचा विजय झाला आहे. अशोक नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांचा पराभव केला.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या.
अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.
हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.
गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली होती. अशोक नेते यांच्यासमोर काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांचं आव्हान होतं. तर वंचित बहुजन आघाडीने रमेश गजबे यांना उमेदवारी दिली.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडींचा २,३६,८७० मतांनी पराभव केला होता.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
अशोक नेते | भाजप | ५,३५,९८२ |
नामदेव उसंडी | काँग्रेस | २,९९,११२ |
रामराव ननावरे | बसपा | ६६,९०६ |
रमेशकुमार गजबे | आप | ४५,४५८ |
नोटा | २४,४८८ |
२०१९ लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल पाहण्यासाठी तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा.