गोव्याची प्रसिद्ध ५०० वर्ष जुनी फेनी दारु का आहे आजही प्रसिद्ध

ज्याला काजूपासून बनवलं जात. यात कोणतेच सेंद्रिय किंवा कृत्रिम चव असणाऱ्या गोष्टींचा वापर केला जात नाही.

Updated: Jun 14, 2021, 10:09 PM IST
गोव्याची प्रसिद्ध ५०० वर्ष जुनी फेनी दारु का आहे आजही प्रसिद्ध title=

पोपट पिटेकर, झी २४ तास, मुंबई  : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक जण पावसाळ्याच्या दिवसात पार्ट्या करताना दिसून येतात.  पार्टी म्हटलं की दारु आलीच. पार्टी करताना अनेक जण आपला ठरलेला ब्रांडच घेतात. परंतु तुम्हाला आज जरा हटके ब्रांडबद्दल सांगणार आहोत. तुम्ही जरी तुमचा ठरलेलाच ब्रांड घेत असाल तर नक्कीच तुम्ही या ब्रांडचा विचार कराल. फेनी दारु... फेनी दारू ही गोव्यातील प्रसिद्ध दारु आहे. तुम्ही ऐकलचं असेल की गोवा फक्त बीच साठीच नाही तर फेनी दारुसाठी देखील प्रसिद्ध आहे. 

गोव्यातून फिरून आलेल्या अनेकांनी तुम्हाला याबद्दल सांगितलं असेलच. फेनी ही एक प्रकारची दारूच आहे. खूप खास पद्धतीने बनवलं जात. फेनी संदर्भात तेथील सरकारने अनेक पावलं उचली आहे.  आज याच विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

काय असतं फेनी ?

फेनी एक प्रकारे पारंपरिक दारु आहे. ज्याला काजूपासून बनवलं जात. यात कोणतेच सेंद्रिय किंवा कृत्रिम चव असणाऱ्या गोष्टींचा वापर केला जात नाही. ‘फेनी’ हा शब्द संस्कृत शब्दातून ‘फेना’ पासून घेतलेला आहे. ज्याचा अर्थ ‘झाग’होतो. 

फेनीबद्दल असं सांगितलं जात की दुसऱ्या दारुसारखी फेनी पिल्याने हँगओव्हर होत नाही. गोवा सरकारने 2009 मध्ये फेनीला जियोग्राफिकल इंडिकेशन ( GI ) प्रमाणपत्र दिलेलं होतं. 2016 मध्ये गोवा सरकारने फेनीला हेरिटेज दारुचा दर्जा देण्याची प्रोसेस सुरु देखील केली होती.

फेनी किती प्रकारचे असतात ?

गोव्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे फेनी सर्वांत प्रसिद्ध आहे. एक म्हणजे काजू  फेनी आणि दुसरं म्हणजे नारळ फेनी. काजू फेनीच्या तुलनेत नारळ फेनीचं महत्त्व जास्त जुनं आहे. गोव्यात नारळचं उत्पादन जास्त प्रमाणात आढळतं. त्यामुळे हेच कारण आहे की पहिल्या वेळेस नारळापासून फेनी तयार केली गेली. परंतु पोर्तुगलातून येणाऱ्या लोकांनी गोव्यात काजूपासून फेनी बनवण्यास सुरूवात केली.

कसं तयार केलं जात फेनी ?

फेनी तयार करण्यासाठी प्रथम काजू हे फळ पिकल्यानंतर त्याला तोडून बारीक केलं जातं. बारीक केल्यानंतर त्यातून निघणाऱ्या रसाला मातीच्या भांड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलं जातं. त्याला फर्मेंट करण्यासाठी जमिनीत काही वेळ ठेवलं जातं. काही वेळेनंतर याला बाहेर काढून लाकडांच्या आगेत उकळलं जातं. भांड्यात वाफवलेल्या रसाला खूपवेळा उकळलं जातं. यामध्ये फर्मेंट केलेल्या 4 टक्केच रस ही दारु बनते.

उकळण्याचं काम तीन वेळा गेलं जातं. पहिल्या प्रक्रियातून निघणाऱ्या रसाला ऊर्रक म्हटले जातं. हे सर्वांत कमी स्ट्राँग असते. ऊर्रकला पुन्हा उकळून कर कॅजुलो बनवलं जातं. लोकल बाजारात कॅजुलोची किंमत खुप जास्त नसते. आणि सर्वांत शेवटच्या प्रोसेसमध्ये फेनी तयार होते.

अल्कोव्होल किती आणि चव कशी असते ?

फेनीचा फ्लेवर फळासारखं आणि चव तुरट असते. फेनीबद्दल असं देखील म्हटलं जातं की याची टेस्ट वेगळीच आहे. फेनीत अल्कोव्होलची मात्रा 43 % ते 45 % पर्यंत असतो. हेच कारण आहे की याची चव खूप स्ट्राँग असते आणि याचा वास देखील येतो.

ही एक दारुच आहे आणि ती आरोग्याला धोकादायक

फेनीचा वापर फक्त वाईनसाठीच केलं जात असं नाही, तर औषधही करण्यासाठी देखील केलं जातं. दातांच्या समस्या, हिरड्या सूजने, आणि तोंडातील होणाऱ्या आजारावर फेनी गुणकारी ठरतं.तसेच बऱ्याच जणाचं असं देखील म्हणं आहे की, फेनी पिल्यानी शरीर गरम राहतं.  

श्वसन संस्था तसेच पोट साफ राहते. पोट दुखणे किंवा पोटावरील सर्व आजारापासून फेनी हे प्रभावी आहे. परंतु औषधाच्या स्वरूपात फेनी हे योग्य पद्धतीने घेणे गरजेचं आहे, असा दावा केला जातो, पण गरजेपेक्षा जास्त वापर केलं तर आरोग्यच्या दृष्टीने घातक देखील होऊ शकतो. फेनी ही एक दारुच आहे आणि ती आरोग्याला धोकादायक आहे, हे देखील विसरुन चालणार नाही.