अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : गुरू आणि शनिची (Jupiter-Saturn) आज २१ डिसेंबर रोजी महायुती (Great Conjuction ) भारतात ही महायुती सायंकाळी ६.ते ८ या वेळेत पाहायला मिळणार आहे. अवकाशात खगोलशास्त्रातील सर्वात मोठी घटना अनुभवता येणार आहे. खगोल प्रेमींकरता हा अद्भुत नजरणा असणार आहे. २०२० मधील ही सर्वात मोठी खगोलीय घटना आहे.
८०० वर्षांनंतर गुरू-शनिची महायुती होणार आहे. दोन्ही ग्रहांमधील अंतर ०.१ अंशांवर येणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता हा विलोभनीय दृश्य पाहता येणार आहेत. या अगोदर १६२३ साली हे दोन ग्रह एकत्र आहे होते. महायुतीची अनुभूती घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. ही महायुती राजकीय पक्षांची नसून सुर्यमालेतील सर्वात मोठ्या आकारांच्या ग्रहांची आहे. सोमवारी म्हणजे २१ डिसेंबरला संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पश्चिम क्षितीजावर गुरु आणि शनी या दोन ग्रहांची महायुती बघायला मिळणार आहे.
युती म्हणजे काय ?
दोन तारे किंवा दोन ग्रह आकाशात जवळ दिसणे
युतीमध्ये तारे - ग्रह जवळ आल्याने काही फरक पडतो का ?
कोणताही फरक पडत नाही, तारे - ग्रह आकाशात काही कोटी ते प्रकाशवर्ष एवढ्या अंतरावर असतात
महायुती म्हणजे काय ?
सुर्यमालेतील दोन मोठे ग्रह गुरु आणि शनी आकाशात वेगवेगळे न दिसता एका बिंदूप्रमाणे दिसणार
याआधी महायुती 1623 ला झाली होती, पुढील महायुती 2080 ला होणार आहे
गुरु ग्रहाची वैशिष्टे
सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.
स्वतःभोवती फक्त 10 तासांत प्रदक्षणा पुर्ण करतो
सुर्याभोवती 11.86 वर्षात प्रदक्षणा पुर्ण करतो
मुख्यतः हायड्रोजन, काही प्रमाणात हेलियम वायुने भरलेला ग्रह आहे, म्हणून गुरुला Gas Giant असंही म्हणतात
पृथ्वीच्या व्यासापेक्षा 11.2 पट आकाराने मोठा
गुरुला तब्बल ज्ञात असे 79 विविध आकाराचे चंद्र आहेत
यापैकी Ganymede आणि Callisto हे दोन चंद्र तर बुध ग्रहापेक्षा आकाराने मोठे आहेत
ग्रहावर एक लाल रंग ठिपका दिसतो, रेड स्पॉट नावाने ओळखलं जातो, ग्रहावरील ते एक चक्रीवादळ आहे, ज्याचा आकार पृथ्वीपेक्षा 1.3 पट मोठा आहे
पायोनियन -10 हे गुरु ग्रहाजवळ पोहचणारे सर्वात पहिले यान
शनी ग्रहाची वैशिष्ट्ये
सुर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह
शनी स्वतःभोवती 10.7 तासांत प्रदक्षणा पुर्ण करतो
शनी सुर्याभोवती 29.4 वर्षात प्रदक्षणा पुर्ण करतो
मुख्यतः हायड्रोजन, काही प्रमाणात हेलियम वायुने भरलेला ग्रह आहे, म्हणून शनी Gas Giant असंही म्हणतात
शनीची घनता खुप कमी असल्याने पाण्याच्या मोठ्या पृष्ठभागावर सहज तरंगू शकतो
पृथ्वीच्या व्यासापेक्षा 9.5 पट आकाराने मोठा
शनी ग्रहाला ज्ञात असे 82 विविध आकाराचे चंद्र आहेत
यापैकी Titan हा चंद्र बुध ग्रहापेक्षा आकाराने मोठा आहे
शनीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ग्रहाभोवती असलेली कडी
धुळ,दगड, बर्फ यापासून बनलेल्या विविध आकाराच्या असंख्य कडी शनी भोवती आहेत
पायोनियन -11 हे गुरु ग्रहाजवळ पोहचणारे सर्वात पहिले यान