14 वेळा प्रयत्न करून देखील गर्भधारणा अयशस्वी; सलमानमुळे आई होऊ शकली 'ही' अभिनेत्री...

बिग बॉस 14 मध्ये दिसलेली कश्मीरा शाह या शोमध्ये थोड्या काळासाठी नक्कीच आली होती.

Updated: Sep 3, 2022, 11:23 PM IST
14 वेळा प्रयत्न करून देखील गर्भधारणा अयशस्वी; सलमानमुळे आई होऊ शकली 'ही' अभिनेत्री... title=

मुंबई :  बिग बॉस 14 मध्ये दिसलेली कश्मीरा शाह या शोमध्ये थोड्या काळासाठी नक्कीच आली होती. पण या शोमध्ये तिची सगळ्यात जास्त चर्चा झाली. कश्मीरा सध्या तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. ज्याचे फोटो तिचा पती कृष्णा अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसं, कश्मिरा हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. चित्रपटांपेक्षा ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. कश्मिराने कृष्णासोबत दुसरं लग्न केलं आहे. दोघांनी 2015 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती.

पप्पू पास हो गया या चित्रपटाच्या सेटपासून त्यांच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली. दोघंही शूटिंगनंतर सगळा वेळ एकत्र घालवू लागले आणि नंतर खूप जवळ आले. 2007 मध्ये कश्मिराने तिचा पहिला पती ब्रॅड लिस्टरमनला घटस्फोट दिला आणि कृष्णासोबत अनेक वर्षे राहू लागली. अखेर 2013 मध्ये दोघांनीही आपल्या नात्याला लग्नाचं नाव दिलं.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कश्मिराचा खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला. जेव्हा तिला गर्भधारणा करण्यात अडचण येत होती. नैसर्गिकरित्या गरोदर राहत नसल्यामुळे, कश्मीरा आणि कृष्णा यांनी IVF तंत्राचा अवलंब केला परंतु गोष्टी यशस्वी झाल्या नाहीत. एका मुलाखतीत कश्मिराने सांगितलं होतं की, तिने प्रेग्नंट राहण्यासाठी 14 वेळा IVF तंत्राचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र ही अभिनेत्री सलमानमुळे आई होऊ शकली आणि याला कारण म्हणजे  सलमान खानने तिला सरोगसीचा सल्ला दिला. जो तिच्यासाठी खूप प्रभावी ठरला. कृष्णा-काश्मिराने सरोगसीचा अवलंब केला आणि 2017 मध्ये त्यांना दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. ज्यानंतर त्यांचं जीवन आनंदाने भरलं.