'चला हवा येऊ द्या' शोमधून 'या' महत्वाच्या कलाकाराची एक्झिट?

'चला हवा येवू द्या' या कार्यक्रमाने  फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे

Updated: Jul 26, 2022, 08:41 PM IST
'चला हवा येऊ द्या' शोमधून 'या' महत्वाच्या कलाकाराची एक्झिट? title=

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग म्हणजे आयुष्यात असणारा सर्व त्रास विसरण्याची प्रत्येक वेळी मिळणारी एक नवी संधी. कार्यक्रम सुरु झाला त्या क्षणापासून भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या आणि अशा बऱ्याच कलाकारांनी 'चला हवा येऊ द्या' ला घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. 

प्रत्येक कलाकारानं त्यांच्या परिनं या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत भर टाकली आहे. काही कलाकार तर, चाहत्यांच्या कुटुंबाचाच भाग समजू लागले. अशा या सुरेख आणि हसऱ्या कुटुंबातून अर्थात 'चला हवा येऊ द्या'मधून एक आघाडीची नावं एक्झिट घेणार असल्याच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. अभिनेता सागर कारंडे कार्यक्रमाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. क्षणार्धातच आता कार्यक्रमाचं पुढे काय? असा चिंताजनक सूरही चाहत्यांनी आळवला.

खरंतर या आधी ही चर्चा  हिंदी वाहिनीवरील एका कार्यक्रमासाठीच सागरने कार्यक्रम सोडत असल्याचंही म्हटलं गेलं होतं.  आता अजून एका व्हिडिओमुळे या चर्चांना वेग मिळाला आहे. हा व्हिडिओ श्रेया बुगडेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुठेच सागर कारंडे दिसत नाहीये. हा व्हिडिओ श्रेया बुगडेने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चला हावा येऊ द्या कार्यक्रमाचा सेट लोकेशन बदलण्यात आल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय. व्हिडिओ शेअर करत श्रेयाने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''तब्बल ८ वर्षांनी ,नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे''.... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तसंच आम्हाला मिळालेल्या  सुत्रांच्या माहितीनुसार सागर या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याची माहिती समोर आलीये.  त्यामुळे खरंच सागर हा शो सोडणार की या फक्त अफवा आहेत हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे सागरच्या प्रतिक्रीयेची.