"मरता मरता वाचले"; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

प्री-वेडिंग फोटोशूटसाठी गेलेल्या अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. जे एक्ट्रेससोबत घडलं त्यांमुळे अभिनेत्रीचा जीव थोडक्यात बचावला आहे.

Updated: Mar 18, 2024, 12:30 PM IST
"मरता मरता वाचले"; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आर्या वोरा २०१३ मध्ये तिची पहिली मालिका 'देवों के देव...महादेव'मधून घरा-घरात पोहचली. या मालिकेनंतर तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग वाढला. अभिनेत्री सोशल मीडियावर कॉन्टेंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. २६ फेब्रुवारीला ती तिच्या बॉयफ्रेंड रंजीतसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या तिचं प्री-वेडिंग फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. कारण अभिनेत्रीने स्पीति व्हॅलीमध्ये - 22 डिग्रीमध्ये हाइपोथर्मियामुळे तिची अवस्था जवळजवळ मृत्यू झाल्यासारखी झाली होती.  

नुकतंच Aarya Vora ने तिच्या इंस्टाग्रामवर स्पीति व्हॅलीमध्ये तिच्या  प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो की, आर्या थंडीमूळे बेशुद्ध होत आहे. मात्र तरिही ती  स्ट्रॅपलेस काळ्या रंगाचा गाऊन परिधान करुन कमी तापमानात शूटींग करत आहे. यासोबतच आर्याने खुलासा केला आहे की, ती हाइपोथर्मियामुळे मरता-मरता वाचली.

मरता-मरता वाचली आर्या
या दरम्यान आर्याला तिचा ड्रीम शॉट मिळाला, ज्याचा जवळ जवळ ती एक वर्ष प्लॅनिंग करत होती. बऱ्यात नेटिझन्सने खूप थंडीत शूटिंग करण्याच्या डिसीजनवर बरचं काही सांगितलं. एका युजरने लिहीलं की, 'यासाठी शिक्षा आणि सामान्य ज्ञान महत्वाचं आहे.' तर अजून एकाने लिहीलं, 'हे पाहणं खूपच कॉमेडी आहे  आणि दुखद आहे की, फोटो किती महत्वाचे असतात. कोणी एका शॉटसाठई आपल्या जिवाची पर्वाही करत नाही. हे भगवान' तर अजून एकाने लिहीलंय की, 'बापरे हे खरं आहे की ही, फक्त प्री-वेडिंगसाठी हे सगळं करत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वप्न खरं करण्यासाठी केलेल्या गोष्टीमुळे लोकांनी अभिनेत्रीचं केलं कौतुक
खरंतर, काही लोकांनी आपलं स्वप्न जगण्यासाठी आर्याच्या धाडसी पाऊलाबद्दल तिचं कौतूक केलं आहे. एकाने कमेंटच्या माध्यमातून लिहीलं आहे की, लोकं नेहमीच बोलणार की, ''तु हे स्वप्न पाहिलं आहेस. जे पुर्ण करणं तुझा अधिकार आणि पसंत आहे. मात्र जर तुला वाटतं की, हे जोखिम उचलण्याच्या लायक आहेस तर हे पुर्णपणे तुझी पसंती आहे. तर अजून एकाने लिहीलंय, याची चिंता करु नकोस, तुझे हे दिवस पुन्हा नाही येणार. त्यामुळे तुला जसं जगायचं आहे तसं तु जग, स्वप्न पहा आणि ते साध्य करण्यासाठी संघर्ष कर. तुझा प्रवास इतरांना प्रेरणा देईल.''