‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'चित्रपट का पहावा आणि कोणी पहावा...'

आता या चित्रपटाबद्दल 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीने प्रतिक्रिया केली आहे. तिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

नम्रता पाटील | Updated: May 3, 2024, 07:38 PM IST
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'चित्रपट का पहावा आणि कोणी पहावा...' title=

Swargandharva Sudhir Phadke Review : सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटाबद्दल 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीने प्रतिक्रिया केली आहे. तिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. आता राधिका देशपांडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटातील अभिनेत्यांसोबत फोटो कोलाज करुन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. याला कॅप्शन देताना तिने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.  

राधिका देशपांडेची पोस्ट

"कागद हरवला आणि गीत रामायण घडले. वनवास ज्याचा विधिलिखित होता तो राम (सुधीर) फडके. ‘या सुखांनो या‘ स्वरबद्ध करता करता दुःखांना वाट करून देणारे सुधीर स्वरगंधर्व ह्यांना मल्टिप्लेक्स मधे अनुभवले. समुद्राच्या खोल खोल गहिऱ्या तळाशी घेऊन जाणारा हा प्रवास. त्यात इंद्रधनुषी रंगांच्या सुमधुर स्वरांचे तुषार अंगावर घेत सुधीर फडके ह्यांचा शोध घेत आपण पोहोचतो समुद्राच्या तळाशी जिथे आपल्या अंगावरचे रंग फिके पडतात आणि दिसतो तो शून्य स्वरुपी काळा रंग. शून्यातून विश्व उभे करणारे स्वरगंधर्व सुधीर फडके गवसतात. 

योगेश देशपांडे ह्याची उत्कृष्ट अशी कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन नसते तर सुधीर फडके ह्यांचे दर्शन घडले नसते. सुनील बर्वे दादानी जीव ओतला आहे, नव्हे नव्हे तो जगला आहे असे आपण म्हणू या. शरद दादा - डॉ. हेडगेवार ह्यांची भूमिका केली शरद दादा ह्याने. तेजस्वी डोळे आणि आकृष्ट करणाऱ्या देहबोली मुळे डॉ. हेडगेवार एका मिनिटासठी मल्टिप्लेक्स मधे आलेत असे वाटते. 

विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ग. दि. माडगूळकरांची भूमिका करणारे सागर तळाशिकर ह्यांचा, कमाल काम! आणि मृण्मयी देशपांडे आणि आदिष वैद्य आणि सगळेच कलाकार. विशेष कौतुक निर्माते सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे ह्यांचे ज्यांनी एव्हरग्रीन क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट जगातले बाबूजी नव्या पिढीपर्यंत पोहोचवले. चित्रपट का पहावा हे मला सांगायची गरज वाटत नाही. हं कोणी पहावा तर ज्यांच्या घरी थोडेसे तरी कलेचे वातावरण आहे अशा प्रत्येकाने, विशेष करून नव्या पिढीने. चिरकाळ लक्षात रहावा म्हणून चित्रपट गृहात आजच पहा “स्वरगंधर्व सुधीर फडके”, असे राधिका देशपांडेने म्हटले आहे. 

दरम्यान ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे हे सुधीर फडके यांच्या भूमिकेत झळतक आहेत. तर पत्नी ललिताबाई फडके यांच्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकली आहे. यासोबतच सागर तळाशीकर (ग. दि. माडगूळकर), मिलिंद फाटक (राजा परांजपे), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), धीरेश जोशी (वीर सावरकर), शरद पोंक्षे (डॉ. हेडगेवार), अविनाश नारकर असे अनेक कलाकार यात दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडेने केले आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x