ईशा गुप्ताकडून आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड व्हिडिओ शेअर,चाहत्यांना फुटला घाम

आश्रम 3 मध्ये बोल्डसीनमुळे चर्चेत आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने पून्हा एकदा आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. 

Updated: Jun 9, 2022, 05:06 PM IST
ईशा गुप्ताकडून आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड व्हिडिओ शेअर,चाहत्यांना फुटला घाम title=

मुंबई : आश्रम 3 मध्ये बोल्डसीनमुळे चर्चेत आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने पून्हा एकदा आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. या संदर्भातला व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंतचा हा तिचा सर्वांत बोल्ड व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. या व्हिडिओवर सध्या तुफान कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.  

 ईशा गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच फोटो,व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आता तिने असाच एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडिओ ठरत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओत काय?
या व्हिडिओमध्ये ईशा गुप्ता कधी तिच्या घराच्या बाल्कनीत तर कधी हॉटेलच्या लॉबीमध्ये बोल्ड कपडे घालून फिरताना दिसतेय. तर अभिनेत्री ब्रालेसपासून बिकिनीपर्यंतच्या सर्वात बोल्ड अवतारात दिसून येत आहे. ईशाच्या या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पोस गुलारही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ईशाचा बॉयफ्रेंड अनेकवेळा ईशाच्या आरशाच्या मागे सेल्फी काढताना दिसत होता. ईशाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच तिचे चाहते फोटोवर आगीचा ईमोजी शेअर करून कमेंट आणि लाईक्स करत आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

बोल्ड फोटोही शेअर
ईशा गुप्ताचा निळ्या रंगाचा बिकिनी घातलेला फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाची बिकिनी घालून एका बीचवरीव टेबलवर झोपलीय. या फोटोमध्ये ईशाने तिचा चेहरा हाताने झाकला होता. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने 'डे ड्रीमिंग' असे कॅप्शन लिहिलेय. 

'आश्रम 3' मध्ये सोनियाच्या भूमिकेत 
ईशा गुप्ता नुकतीच 'आश्रम 3' मध्ये सोनियाच्या भूमिकेत दिसली होती. या वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ताने बॉबी देओलसोबत बरेच इंटिमेट सीन्स दिले होते. हे सीन्स इतके बोल्ड होते की त्यांचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.