'मी स्वस्त मजूर आहे' द फॅमिली मॅनसाठी मिळालेल्या मानधनावरुन मनोज वाजपेयीची खंत

Manoj Vajpayee on his Fees: आज ओटीटीवर नाना तऱ्हेचे चित्रपट, सिरिज येताना दिसत आहेत. त्यातील एक गाजलेली सिरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'. परंतु या सिरिजमधून समोर आलेले अभिनेते मनोज वाजपयी यांनी मात्र आपल्याला दिलेल्या कमी पैशांबाबत खुलासा केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 19, 2023, 09:43 PM IST
'मी स्वस्त मजूर आहे'  द फॅमिली मॅनसाठी मिळालेल्या मानधनावरुन मनोज वाजपेयीची खंत title=
June 19, 2023 | actor manoj bajpayee says he didnt get paid as much as he must get paid

Manoj Vajpayee on his Fees: सध्या जमाना आहे तो म्हणजे ओटीटीचा. त्यामुळे येथे अनेक मोठे स्टार्स प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची फार चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या ओटीटीवर कोणाची चर्चा असेल तर ती म्हणजे मनोज वाजपयी. सध्या ओटीटीवर मनोज वाजपयी याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. फॅमिली मॅनसाठी त्यानं सलमान खान, शाहरूख खान एवढी फी घेतली का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर त्याचे उत्तर व्हायरल झाले असून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पाहा यावर त्यानं नक्की काय उत्तर दिलं आहे? 

फॅमिली मॅन ही त्याची वेबसिरिज प्रचंड गाजली. त्याच्या या सिरिजला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यामुळे त्याच्या लोकप्रियेतत चांगलीच वाढ झाली होती. परंतु या फॅमिली मॅन वेबसिरिजसाठी त्याला फारच कमी पैसे मिळाले असे त्यानं सांगितले आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं याबद्दल सांगितले आहे. 

या युट्यूब चॅनल 'अनफिल्टर्ड बाय सॅमदिश' ला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं याबद्दलचा खुलासा केला आहे. त्याला गप्पांच्या दरम्यान त्याच्या बॅंक बॅलन्सबद्दल विचारण्यात आले. त्याच्यासंबंधी तो एक प्रश्न होता. तेव्हा तो म्हणाला की, 'भोसले' किंवा 'गली गुलेएयान' अशा चित्रपट करून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. तेव्हा त्याच्या 'द फॅमिली मॅन' या सिरिजचा उल्लेख झाला होता. त्यावर तो म्हणाला की त्याला या सिरिजसाठी त्याला पाहिजे तसे पैसे मिळाले नाहीत. त्याला सलमान खान किंवा शाहरूख खान एवढे पैसे मिळाले का? तेव्हा तो म्हणाला, ''हे ओटीटी वाले साधारण निर्मात्यांपेक्षा काही कमी नाहीत. ते फक्त मोठ्या बड्या कलाकारांना, स्टार्सना पैसे देतात. मला तसे पैसे मिळाले नाहीत जसे मला पाहिजे होते आणि जे मला मिळायला हवे होते.''

हेही वाचा - 'गंगूबाई' म्हणून घराघरात पोहचलेल्या बालकलाकार Saloni Daini चे बिकीनी फोटोज व्हायरल

ते पुढे हेही म्हणाले की, जेव्हा हॉलिवूडचे कलाकार येतील तर तेव्हा त्यांना खूप चांगले पैसे दिले जातील. ''चीनमध्ये अनेक फॅक्टरी आहेत कारण तिथे कमी पैशात काम करणारी लोकं आहेत आणि मी येथे हा कमी पैशातला काम करणारा माणूस आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडेच चर्चा सुरू झाली आहे. मनोज वाजपयी यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून कामं केली आहेत आणि सोबतच त्यांच्या चित्रपटांचेही भरपूर कौतुक झाले आहे. आता ते ओटीटीवरील स्टार झाले आहेत.