अभिनेता आर. माधवनच्या खांद्यावर शस्त्रक्रिया

अभिनेता आर. माधवन सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. आज सकाळी पोस्ट केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबाबत काळजीत पडले आहेत. पण  लवकरच तो ट्रॅकवर येतोय अशी माहिती त्याने दिली आहे. 

Updated: Feb 26, 2018, 09:43 PM IST
अभिनेता आर. माधवनच्या खांद्यावर शस्त्रक्रिया  title=

मुंबई : अभिनेता आर. माधवन सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. आज सकाळी पोस्ट केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबाबत काळजीत पडले आहेत. पण  लवकरच तो ट्रॅकवर येतोय अशी माहिती त्याने दिली आहे. 

नेमके कारण काय ? 

आर माधवन याने नुकतेच उजव्या खांद्यावर ऑपरेशन झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे सध्या तो रुग्णलयात दाखल असल्याची माहिती दिली आहे.   खांद्यावरील शस्त्रक्रियेचे नेमके कारण समजू शकले नाही.  

 

आगामी प्रोजेक्ट 

आर माधवन लवकरच 'चंदामामा दूर के ...' या चित्रपटामध्ये अभिनेता सुशांत सिंग कपूरसोबत दिसणार आहे.  "Breathe" या वेबसीरीजमध्ये आर माधवन दिसत आहे. या वेबसीरीजमध्ये तो काही एक्स्ट्राऑर्डनरी घटनांवर कशी मात करतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे.