सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

 रजनीकांत यांच्यावर चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Updated: Oct 28, 2021, 09:49 PM IST
सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

मुंबई: मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रजनीकांत रूटिन चेकअपसाठी रुग्णालयात आले असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला दिला आहे. 

रजनीकांत यांना नेमका कोणता त्रास होतो आहे हे मात्र सध्या समजू शकलेलं नाही. रजनीकांत यांनी आज एका अॅपद्वारे व्हॉइसनोट जारी केली आहे. अन्नात्थे या आगामी चित्रपटाबाबत ही नोट आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने समन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांनी राज बहादुर बस चालकाला समर्पित केला आहे. या बस चालकाने पहिल्यांदा रजनीकांत यांच्यातील कला आणि हुनर ओळखली होती. त्याने अभिनय क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं होतं.