बोल्ड कपडे अन् Video Call, 'ही' अभिनेत्री ठरतेय चर्चेचा विषय

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 25, 2022, 10:09 AM IST
बोल्ड कपडे अन् Video Call, 'ही' अभिनेत्री ठरतेय चर्चेचा विषय  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अमिषा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, 46 वर्षीय अमिषा ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. तिचे हे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण होतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अमिषानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अमिषानं पांढऱ्या रंगाची स्पॅगिटी आणि लाल रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. अमिषानं परिधान केलेली स्पॅगिटी ही डीप नेक आहे. या व्हिडीओत अमिषाच्या एका हातात कॉफी मग असून ती कोणाशी तरी व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचे दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ शेअर करत अमिषानं कॅप्शनमध्ये लिहिले की, 'राजकोट... खूप काळानंतर आणि हा संपूर्ण दिवस हेक्टिक गेला. त्यानंतर मी माझ्या चाहत्यांशी बोलले. व्हिडिओ कॉल मॅनेज करण्यासाठी श्री महेश यांचे आभार.'

अमिषा पटेल लवकरच 'गदर 2' मध्ये सनी देओलसोबत दिसणार आहे. अमिषा अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे पण फक्त दोनच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक धूम ठोकली. या चित्रपटांमध्ये 'कहो ना प्यार है' आणि सनी देओलसोबतचा 'गदर' हा चित्रपट आहे.