नेमकं करायचं काय होतं? अभिनेत्रीच्या विचित्र बिकीनी लूकवर नेटकऱ्यांचा प्रश्न

तिचे फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सही हैराण   

Updated: Aug 31, 2021, 08:26 PM IST
नेमकं करायचं काय होतं? अभिनेत्रीच्या विचित्र बिकीनी लूकवर नेटकऱ्यांचा प्रश्न  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सतत विविध कारणांनी फोटोशूट करत असतात. पण, प्रत्येक वेळी त्यांचं हे फोटोशूट फॉलोअर्स आणि चाहत्यांच्या पसंतीस उतरेलच असं नाही. अशा वेळी बऱ्याचदा फॉलोअर्स मग या सेलिब्रिटींना खडे बोल सुनावतात. 

Amazon Prime च्या ‘तांडव’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अमायरा दस्तूरलाही अशाच प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. कारण ठरलं ते म्हणजे तिचा बिकीनी लूक. 

जेव्हा भूमी पेडणेकरला विचारलं, कोणासोबत एक रात्र घालवशील की....? 

अमायरा दस्तूर (Amyra Dastur) हिचे बिकीनीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. जिथं ती या लूकमध्ये पाण्यात उभी असल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये अमायरानं जी बिकीनी घातली आहे तिचं गणित काहीसं गंडल्याचं पाहताच नेटकऱ्यांच्या लक्षात आलं. 

बस्स, मग काय. तिथं अमायराचा फोटो आणि इथं नेटकऱ्यांच्या संतापाची टक्कर झाली. पाहता पाहता अमायराच्या या लूकवर संतप्त प्रतिक्रियांचा भडिमार होण्यास सुरुवात झाली.

अवघ्या काही पैशांसाठी इतकीही खालच्या थराला जाऊ नकोस इथपासून ते हा लूक काहीसा अनकम्फर्टेबल आहे अशा बऱ्याच कमेंट तिच्या या फोटोंवर करण्यात आल्या. कोणी तिच्या संस्कारांवर तर कोणी तिच्या कपड्यांच्या निवडीवर संताप व्यक्त केला.