अभिनेत्रीनं केलं बाथटबमध्ये आगळवेगळं फोटोशूट; नेटकऱ्यांना photo पाहून काय बोलावं हेच कळेना

मध्यंतरी तिनं ट्रे़डिशनल लुकमध्ये केलेलं तिचं बोल्ड फोटोशूट खूपच गाजलं होतं. 

Updated: Sep 4, 2022, 08:06 PM IST
अभिनेत्रीनं केलं बाथटबमध्ये आगळवेगळं फोटोशूट; नेटकऱ्यांना photo पाहून काय बोलावं हेच कळेना title=

Ayesha Singh Photos: 'गम है किसीके प्यार में' या मालिकेत सई या व्यक्तिरेखेची भूमिका साकारणारी आयशा सिंग सोशल मीडियावर सतत आपल्या बोल्डनेसचा शिडकावा करत असते. मध्यंतरी तिनं ट्रे़डिशनल लुकमध्ये केलेलं तिचं बोल्ड फोटोशूट खूपच गाजलं होतं. 

अलीकडेच, गणेश उत्सवादररम्यान तोकडे कपडे घालून आल्यानं तिला नेटकऱ्यांनी खूपच ट्रोल केलं होतं. पण ट्रोल झाल्यानंतर आयशा सिंह आता बाथरूममध्ये बाथटबमवर बसून सोशल मीडियावर असे आगळेवेगळे फोटोशूट केले आहे की हे फोटो पाहताच ते व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सईने बाथटबमध्ये बसून असे फोटो काढले आहेत की ते पाहून तुम्हीही म्हणाल की काय बोलावं ते कळेना. 

या फोटोंमध्ये सईने गोल्डन कलरचा कोट आणि पँट घातलेली दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीने केसांचा बन बनवला आहे आणि हलक्या मेकअपमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

हा ड्रेस परिधान करून अभिनेत्री बाथरूममध्ये पोहोचली आणि बाथटबमध्ये बसून कॅमेऱ्यासमोर तिचा किलर लुक दाखवताना दिसत आहे. फोटोत ती केस उघडून तिच्या किलर लूकची जादू दाखवताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये सईने केवळ बाथटबमध्ये बसून फोटोशूट केले नाही तर पलंगावर बसून बोल्ड फोटोशूट केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे फोटो सईने स्वत: तिच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले - 'ग्लिटरी आणि रेट्रो'. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या लूकचे कौतुक करायला सुरुवात केली.