मृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' अभिनेत्री

सध्या तिची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Updated: Nov 26, 2019, 11:48 AM IST
मृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' अभिनेत्री  title=

मुंबई : शनिवारी सकाळी टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला (Gehana Vasisth)हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल केलं होतं. तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये दाखल करण्यात आलं आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे टीव्ही कलाकारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ब्रेक न घेता सतत काम केल्यामुळे तिची स्थिती चिंताजनक होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

DmFind a manager.which ll be only girl Who manage all colaboration plz dm .#gandiibaat #gandibat #artist #armani #concept #deepikapadukone #edits #film #fun #followforfollowback #gehanavasisth #having #healthyfood #healthylifestyle #insta #india #instagram #catsofinstagram #justinbieber #kourtneykardashian #lovely #lovequotes #music #mumbai #naturalhair #offensivememes #brandcollaboration

सध्या तिची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. गहनाच्या स्थितीसंबंधीत डॉ. प्रणव काबरा यांनी भाष्य केले, 'गहना सेरेब्रल ओडेमा आणि कोमामध्ये जाण्याची शक्यता होती. जर रूग्णालयात पोहोचण्यासाठी काही मिनटं उशीर झाला असता तर ते तिच्या जीवनावर बेतू शकलं असतं.'

थकव्यामुळे तिचं रक्तदाब फार कमी झाला होता. वेळेत डॉक्टरांनी सीपीआर आणि इलेक्ट्रॉनिक शॉक देखील दिल्यामुळे तिची परिस्थिती आता स्थिर आहे. गहना आता एका वेब सीरिजचं शुटिंग करत होती. 

याअगोदर तिने स्टार प्लसवरील मालिका 'बहनें'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच तिने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये ही काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी गहना 'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये देखील झळकली.