...आणि अभिनेत्री काजोल नाका-तोंडावर पडली; व्हिडीओ व्हायरल

नुकताच काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत काजोल सतत पडताना दिसते. 

Updated: May 5, 2024, 08:27 PM IST
...आणि अभिनेत्री काजोल नाका-तोंडावर पडली;  व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : 'लस्ट स्टोरीज 2' आणि 'द ट्रायल'मध्ये दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह दिसत आहे. काजोलने तिच्या फिल्मी करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 'बेखुदी' या तिच्या पहिल्या चित्रपटापासून ते आता OTT पर्यंत तिने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळेही कायम चर्चेत असते. आता अलीकडेच अभिनेत्रीची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, काजोलने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

नुकताच काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत काजोल सतत पडताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत काजोलने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, माझे सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर मला जाणवलं की मी अजूनही आश्चर्यकारकपणे चांगली वागले आहे.! चला तर मग एक थंडीची गोळी घेऊ आणि काही व्हिडिओ पुन्हा पाहू ज्याने इतर लोकं हसतील. सध्या काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासह ति च्या चाहत्यांनीही या व्हिडीओवर कमेंट केल्या असून त्यावर जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहेत. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, पडली नसतीस तर आज काजोल बनली नसतीस. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, ‪U feel guilty while laughing तर अजून एकाने म्हटलंय, खूप ड्रामेबाज! . पण, मला ती सायकल आवडलं. तर अजून एकाने लिहीलंय, You make me feel okay about myself. तर अजून एकाने लिहीलंय की, क्वीन द्वेष करणाऱ्यांना तिच्याबद्दल बोलण्यासाठी संधी सोडत नाही आणि नेहमी त्यांच्या मर्यादा ओलांडते  माझं तुझ्यावर प्रेम आहे क्वीन. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या व्हिडीओवर करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजोलने तिच्या इंस्टाग्रामवर एक किंवा दोन नाही तर चार व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यामध्ये काजोलचा अनेकदा तोल कसा गेला हे  पाहिलं जाऊ शकते. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' फेम अभिनेत्रीने जागतिक हास्य दिनानिमित्त हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x