'या' कारणामुळे तुटलं होतं अभिनेत्री मानसी नाईकचं लग्न

अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायमच स्पष्ट मत मांडणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं. आज अभिनेत्री तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: Feb 2, 2024, 08:05 AM IST
'या' कारणामुळे तुटलं होतं अभिनेत्री मानसी नाईकचं लग्न title=

मुंबई : मानसी नाईक ही मराठी अभिनेत्री असण्यासोबतच खूप उत्कृष्ट डान्सरही आहे. मानसीने मराठी तसंच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे.  २००७ साली जबरदस्त या मराठी चित्रपटाद्वारे तिने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. आज अभिनेत्री तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. २ फेब्रुवारी १९८७ साली अभिनेत्री मानसी नाईकचा जन्म झाला.  मानसी नाईक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री जितकी चर्चेत तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे असते तितकीच चर्चेत ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळे असते.  मानसीने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरासह लग्न केलं होतं. मात्र तिचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. सध्या मानसीच्या घटस्फोटाचा वाद कोर्टात सुरु आहे. तिने नवऱ्यावर आरोप केले आहेत.

आज अभिनेत्री तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमीत्ताने आम्ही तुम्हाला अभिनेत्रीनेबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जरी अभिनेत्री या ग्लॅमरस जगतात खूप खूश दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात या अभिनेत्री बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या घटस्फोटावर भाष्य केलं होतं. 

मानसीने भार्गवी चिकमुलेच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी मानसीने लग्न, घटस्फोट यावर मनमोकळेपणाने संवाद साधला. या मुलाखतीत तिने तिची बाजू मांडली जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. मानसी म्हणाली, 'मला लग्न करायचं होतं. माझं कुटुंब असावं असं मला वाटत होतं. पण झालं वेगळंच. फक्त प्रसिद्धी, रील्सचा हा प्रवास होता. जे मला सांगण्यात आलं ते सगळं खोटं नव्हतं. आता कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. पण माझं जे लग्नाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही. 

तरी मी ते नक्की करेनच माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. लग्नात जेव्हा कळतं की काहीतरी चुकतंय तेव्हा कोणतीही मुलगी आधी लग्न टिकवण्याचा प्रयत्न करते. तेच मी केलं. पण एक वेळ अशी आली की आता बस्स झालं. मला वाटतं ममता ही फक्त आईची असावी बायकोची नाही. मी आई म्हणून सगळ्या गोष्टी केल्या. पण इतकंही कोणाला लाडोबा बनवायचं नाही हे मला कळलं. एक मुलगी लग्न करते. तिच्या बकेट लिस्टमध्ये ती एक इच्छा असते की लग्न करायचं, कुटुंब असावं. चुडा, त्यात फोटो, सिंदुर हे मी सगळं प्रेमाने केलं. सप्तपदी, होमहवन, मेहंदीचा अर्थ काय हे ज्यांना माहितच नाहीए आणि अनादर करायच्या पलीकडे माहित नाही म्हणल्यावर काय करणार. मी ग्लॅमरस दिसत असले तरी माझे पाय जमिनीवर आहेत. मला माहित आहे की मला काय हवंय. मी जर स्वत: ते शिकले किंवा माझ्या अंगी मी ते आणलं तर मी माझ्या मुलांना शिकवेल ना. मला आई व्हायचं होतं..म्हणूनच मी रडले.' असंही तिने दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.