करवा चौथ साजरा करताना या अभिनेत्रीचा नवरा झाला रोमँटिक

पहिल्या करवा चौथवेळी अभिनेत्रीचा नवरा झाला खूपच रोमँटिक...

Updated: Oct 14, 2022, 09:01 PM IST
करवा चौथ साजरा करताना या अभिनेत्रीचा नवरा झाला रोमँटिक title=

Mouni Roy Karwa Chauth : देशासह जगभरात बुधवारी करवा चौथ सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. बॉलिवूडमधील स्टार जोडप्यांनी करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रसिद्ध टीव्हीअभिनेत्री आणि नागिन या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मौनी रॉयनेही आपल्या करवा चौथचे फोटो शेअर केले आहेत.

मौनीने तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मौनी तिचा पती सूरज नांबियार तिला किस करताना दिसत आहे. मौनी आणि सूरज नांबियारचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉयने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ खास पद्धतीने साजरा केला. या फोटोंमध्ये मौनी रॉयने गोल्डन कलरची प्लेन साडी नेसलेली होती. या खास दिवशी तिचा लूक वेगळा करण्यासाठी मौनीने केसांचा बन बनवला आणि त्यात गुलाबाची लाल फुले होतीत. 

मौनी आणि सूरजचे त्यांच्या  बाल्कनीतील फोटो आहेत. या फोटोमध्ये सूरज नांबियारने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. तर मौनी हातात चाळणी घेऊन त्याच्याकडे बघताना दिसत आहे. यातील एका फोटोमध्ये सूरज मौनीला किस करताना दिसला होता. 

दिशा परमार (Disha parmar) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे टीव्हीचे लोकप्रिय जोडपे आहेत. दोघांच्या लग्नाला 1 वर्ष पुर्ण झाले आहेत. मात्र आजही दोघांमध्ये प्रेम आणि रोमान्स कायम आहे. यावर्षी राहुल आणि दिशा यांनी दुसरा करवा चौथ साजरा केला.