नागरिकांचे प्राण गेल्यानंतरच जागे का होतो? - रेणूका शहाणे

अभिनेत्री रेणूका शहाणे यांनीदेखील पूल दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.

Updated: Mar 15, 2019, 05:24 PM IST
नागरिकांचे प्राण गेल्यानंतरच जागे का होतो? - रेणूका शहाणे  title=

मुंबई : गुरूवारी 14 मार्च रोजी सीएसएमटी स्थानकाजवळ दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर 31 जण जखमी झाले. पूल कोसळल्याने पूलाच्या खाली उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचेही नुकसान झाले. पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सर्वत्र दुख: व्यक्त केले जात आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे यांनीदेखील पूल दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. आपल्या आर्थिक राजधानीची परिस्थिती दयनीय असून आपण नेहमी नागरिकांचे प्राण गेल्यानंतरच जागे का होतो? असा संतप्त सवाल केला आहे. 

सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात २२ मार्चला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही लोकांच्या जीवाची शून्य किंमत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली गेली असली तरी त्या पैशातून गेलेले जीव पुन्हा येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.