'पालक झाल्यावरही ...', अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर रोमांटिक होताच Video Viral

सध्या श्रिया सरनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Updated: Oct 16, 2022, 03:15 PM IST
 'पालक झाल्यावरही ...', अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर रोमांटिक होताच Video Viral title=

Shriya Saravn Viral Video: अनेकदा अभिनेते किंवा अभिनेत्रींना त्यांची लव्ह लाईफ सार्वजनिकरीत्या व्यक्त करणं फारसं आवडत नाही परंतु काही असेही अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांना त्यांचं प्रेम खुलेपणानं व्यक्त करण्यात काहीच अडचण येत नाही. आणि असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबत घडताना दिसलं जेव्हा ती अचानक तिच्या पतीसोबत रोमँटिक होऊ लागली. आम्ही बोलत आहोत श्रिया सरनबद्दल, जी सध्या तिच्या आगामी 'दृश्यम 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रीयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर नेटिझन्स तिच्या या व्हिडीओतील वर्तनामुळे तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. (actress shriya saravn shares a romantic video with her husband goes viral)

सध्या श्रिया सरनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये श्रिया तिचा पती आंद्रेई कोशेव्हसोबत पापाराझींसाठी पोस्ट करताना रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर दोघांनीही कॅमेऱ्यासमोर एकमेकांना किस केले ज्यावरून ती चांगलीच ट्रोल झाली आहे. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

श्रियाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, पालक झाल्यानंतरही मॅच्युरिटी आलेली नाही. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले - घर कमी पडले का? दुसर्‍या यूजरने प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की जे काही करायचे आहे ते घरीच करा, बाहेर काय दाखवता. त्याचवेळी एकाने कॉमेंट केली की, परदेशात जा. अशाप्रकारे अनेक जण तिच्या या व्हिडीओवर वाईट तसेच चांगल्या प्रतिक्रियाही देत आहेत आणि तिच्या अनेक चाहत्यांनी तर त्याच्या व्हिडीओ प्रेमाचा पाऊस पाडला आहे. 

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

श्रिया सरन लवकरच 'दृश्यम 2' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'दृश्यम'चा सिक्वेल आहे. या चित्रपटात श्रियाशिवाय बॉलिवूड अभिनेता अजय देवगणही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर 17 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि श्रिया सरन व्यतिरिक्त तब्बू, इशिता दत्ता आणि अक्षय खन्ना देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.