'त्याने मला बेडरुममध्ये नेले आणि...' प्रसिद्ध अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी अभिनेत्रींना अनेक तडजोडी कराव्या लागतात. खूप वेळा शरीरसुखाची मागणी देखील करण्यात येते. अशा अनेक गोष्टी खूप दिवसांपासून घडत आल्या आहेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 25, 2024, 01:31 PM IST
'त्याने मला बेडरुममध्ये नेले आणि...' प्रसिद्ध अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप title=

Bengali actor Sreelekha Mitra: न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. या अहवालाने सिनेसृष्टीत खळबळ उडवून दिली आहे. या अहवालाने मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या छळ आणि शोषणाची प्रकरणे उघड केली आहेत. अहवाल समोर आल्यानंतर अनेक कलाकार निशाण्यावर आले आहेत. 

दरम्यान, बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक आणि सरकारी केरळ चालचित्र अकादमीचे अध्यक्ष रंजित यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. 

श्रीलेखा मित्रा यांचे आरोप काय? 

अभिनेत्री श्रीलेखा मित्रा यांनी मीडियाशी संवाद साधताना 2009 मध्ये घडलेली घटना सांगितली आहे. रंजीतच्या 'पलेरी माणिक्यम: ओरु पथिरकोलापथकथिंते कथा' या चित्रपटादरम्यान ही घटना घडली होती. अभिनेत्रीने म्हणाली की एका चित्रपटाच्या संदर्भात ती रंजीतला त्याच्या घरी भेटली होती. जिथे तिला दिग्दर्शकाचे वागणे योग्य वाटले नाही. चित्रपटाच्या कथेबद्दल रंजीतशी बोलताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे श्रीलेखा मित्रा यांनी सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, 'तो कॉलवर होता. तिथे बरेच लोक होते. मी ज्या सिनेमॅटोग्राफरसोबत काम केले आहे. त्यांच्याशी ते फोनवर बोलत होते. त्याने मला विचारले की मला त्याच्याशी बोलायचे आहे. त्यानंतर ते मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेले.  

श्रीलेखा म्हणाली की, रंजीत तिला बेडरुममध्ये घेऊन गेला होता. त्या बेडरुममध्ये अंधार होता आणि एक बाल्कनी होती. मी जेव्हा सिनेमॅटोग्राफरशी फोनवर बोलत होते तेव्हा तो माझ्या शेजारी उभा होता. तो माझ्या बांगड्यांशी खेळत होता आणि माझ्या त्वचेला स्पर्श करत होता. त्यावेळी मला अस्वस्थ वाटत होते. पण मला वाटले की कदाचित हा फक्त माझा विचार आहे. मला वाटले कदाचित मी खूप विचार करत आहे आणि त्याला फक्त माझ्या बांगड्या बघायच्या होत्या. खोलीत अंधार होता. मला त्याच्याबरोबर चांगले वाटत नव्हते. त्याला समजले की मी प्रतिक्रिया देत नाही आणि हात काढत नाही, म्हणून त्याने माझ्या केसांशी आणि मानेशी खेळण्याचा प्रयत्न केला. मग मी खोलीतून बाहेर आले. इंडस्ट्रीत काम कसे चालते हे मला माहिती आहे. येथे चांगले आणि वाईट दोन्ही लोक आहेत. असं ती म्हणाली. 

दिग्दर्शक रंजीतने काय दिले उत्तर? 

रंजीतने श्रीलेखाचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. रंजीतने सांगितले की, श्रीलेखा त्यांच्याकडे चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आली होती. त्या  फ्लॅटमध्ये चित्रपट निर्माते शंकर रामकृष्णन आणि इतर लोक उपस्थित होते. ही कथित घटना तिथे घडली नाही. तिने माझ्यावर कायदेशीर कारवाई केली तर तिला तेच उत्तर मिळेल.