नवी दिल्ली : एका पॉर्न स्टारच्या गूढ मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. या पॉर्नस्टारचा मृतदेह बेडवर रहस्यमयरित्या आढळून आल्यामुळ् अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही काळात पॉर्नस्टार्सनी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पॉर्नस्टार्सनी आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यूरियन बेल्ट्रन असे या पॉर्नस्टारचे नाव असून, तिला यूरी लव नावाने ओळखले जात असे. ती अवघ्या 31 वर्षांची होती. तिच्या गूढ मृत्यूमुळे पॉर्न इंडस्ट्रीला मोठा झटका बसला आहे. इंग्रजी वेबसाईट डेलिस्टाला प्रितिक्रिया देताना तिची सहकारी निकी मिलाने म्हटले आहे की, 'मला जड अंतकरणाने सांगवे लागत आहे की, मी पॉर्न इंडस्ट्रीतील आणखी एक सदस्य गमावला. 31 वर्षाच्या यूरी लवचा मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्यामुळे झाला. बेडवर तिचा मृतदेह सापडला. तिच्या मृतदेहाच्या आजूबाजूला अनेक गोष्टी मिळाल्या पण, त्याचा अद्याप खुलासा होऊ शकला नाही', असेही निकी मिलाने म्हटले आहे.
2 नोव्हेंबर 1986मध्ये कॅलीफॉर्नियामध्ये जन्मलेल्या यूरीला वडिलांचे छत्र मिळले नाही. त्यामुळे आपल्या आईच्या प्रेमातच ती लहानाची मोठी झाली. शिक्षण पूर्ण झाल्याव ती एका रेस्टॉरंटमध्ये वेटरेस म्हणून काम करू लागली. ती जेव्हा 18 वर्षांची होती तेव्हा, पेंटहाऊस नावाच्या मासिकात तिची नग्न छायाचित्रे प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने पॉर्नस्टार म्हणून काम करायला सुरूवात केली. तिने तब्बल 177 अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. ज्यात काही टीव्ही मालिकांचाही समावेश आहे. अडल्ट चित्रपटात केलेल्या कामाबद्ध तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे आणखी एका पॉर्नस्टारने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याची घटना पुढे आली होती.