Ruchismita Guru End Her Life : काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबेनं (Akanksha Dubey) बनारसमध्ये एका हॉटेलरूममध्ये गळफास लावत आत्महत्या केली होती. आता मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्काबसला आहे. रुचिस्मिता असं या अभिनेत्रीचं नाव आहे. रुचिस्मिता गुरुचा (Ruchismita Guru) संशयास्पद मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, रुचिस्मिता ही तिच्या नातेवाईकांच्या घरी मृतावस्थेत आढळली होती.
रुचिस्मिता गुरु बलांगीर शहराच्या तलपालीपाडाची रहिवासी होती. तर सुडापाडा येथे मामाच्या घरी रुचिस्मिता राहत होती. रुचिस्मितानं अनेक आल्बम्समध्ये अभिनय केला आहे. रुचिस्मिता ही फक्त तिच्या अभिनयासाठी नाही तर तिच्या गायनासाठी ओळखली जायची. इतकंच काय तर रुचिस्मितानं अनेक कार्यक्रमांमध्ये परर्फॉर्म केलं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आकांशानं आत्महत्या केली. त्याच दिवशी म्हणजे 26 मार्च रोजी रात्री रुचिस्मितानं तिच्या रुममध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येविषयी कळताच बलांगीर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुचिस्मिताचं शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी तिची बॉडी ही भीमा भोई मेडिकल कॉलेज अॅंड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली. रुचिस्मिताच्या आईनं सांगितलं की तिच्यासोबत त्यांचा आलू पराठा बनवण्यावरून वाद झाला होता, असं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.
रुचिस्मिताच्या आईनं पुढे सांगितलं की, मी तिला रात्री आठ वाजता आलू पराठा बनवण्यास सांगितला होता, पण तिनं सांगितलं की रात्री 10 वाजता पराठा बनवणार असं म्हणाली होती. त्यावरून आमच्यात वाद झाला होता. अभिनेत्रीनं या आधी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. सध्या पोलीस तिच्या निधनाचे कारण शोधत आहेत. पोलिसांनी तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा करत आहेत. पण अळी माहिती समोर येत आहे की खूप उशिर झाल्यानं ऑटोप्सी होऊ शकत नाही.
हेही वाचा : Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांना खूप खूप शुभेच्छा; आप खासदाराने केलेल्या ट्विटने वेधलं लक्ष
दरम्यान, आकांक्षा दुबेनं वाराणसीमध्ये एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्याआधी आकांक्षा इन्स्टाग्रामवर लाइव्ह आली होती. त्यानंतर तिनं आत्महत्या केली. लाइव्ह येऊन आकांक्षा खूप रडली होती, असं म्हटलं जात आहे. आता तिच्या निधनाचे कारण तिच्या बॉयफ्रेंडला ठरवलं आहे. आकांक्षा दुबेनं बॉयफ्रेंड समर सिंगला तिच्या चाहत्यांनी जबाबदार ठरवलं आहे.