NCB च्या अटकेनंतर rhea chakraborty ने आर्यन खानला सांगितलं मोठं सिक्रेट?

 2020 मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. 

Updated: Oct 14, 2021, 03:56 PM IST
NCB च्या अटकेनंतर rhea chakraborty ने आर्यन खानला सांगितलं मोठं सिक्रेट?

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. 2020 मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. आर्यनप्रमाणे रियालाही जेलच्या मध्ये राहावे लागले. आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी रियाने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट टाकली आहे जी आर्यनशी जोडली जात आहे.

रिया चक्रवर्तीचा गुप्त संदेश

रिया चक्रवर्तीने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, Grow through what you go through. पण, आता रियाने प्रोफाईलमधून ही स्टोरी डिलीट केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप झाले होते, हे गेल्या वर्षीच घडले होते.
केवळ रियाच नाही, तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीलाही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. दोघांना बरेच दिवस तुरुंगात काढावे लागले. सध्या रिया आणि शोविक दोघेही जामिनावर बाहेर आहेत.

आर्यन खानबद्दल बोलायचं झालं तर, एनसीबीने त्याला अटक केल्यापासून त्याच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आतापर्यंत आर्यनचे वकील त्याला जामीन मिळवून देऊ शकलेले नाहीत. जरी एनसीबीला आर्यन खान कडून ड्रग्स किंवा रोख रक्कम मिळाली नव्हती, तरीही आर्यनला जामीन मिळवण्यासाठी त्याच्या वकिलांना खूप प्रयत्न करावे लागत आहेत.

इथे आर्यन खान तुरुंगात आहे, मन्नतमध्ये त्याचे आई -वडील शाहरुख खान आणि गौरी खान यांची वाईट अवस्था आहे. ते आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

किंग खानचे चाहते त्याला सोशल मीडियावर पाठिंबा देत आहेत. मन्नत बाहेर देखील लोक या कठीण काळात शाहरुख खानला साथ देत आहेत. आर्यनच्या अटकेबाबत अनेक सेलेब्सनी विरोध केला आहे. तनिषा मुखर्जी यांनी या प्रकरणाला 'छळ' असे म्हटले आहे.