सामंथा-विजय देवरकोंडा प्रेमात? रील लाइफमध्ये रोमान्स करता-करता रिअल लाइफमध्ये आले एकत्र

Samantha and Vijay Deverkonda: अनेकदा हे दोन्ही कलाकार त्यांच्या पर्सन आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. कधी विजय देवरकोंडा रश्मिका मंदानासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो तर कधी सामंथा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी होणारी चर्चा जरा वेगळीच आहे. जे ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसू शकतो. 

Updated: Aug 22, 2023, 07:06 PM IST
सामंथा-विजय देवरकोंडा प्रेमात? रील लाइफमध्ये रोमान्स करता-करता रिअल लाइफमध्ये आले एकत्र  title=

मुंबई : सध्या सिनेमांची रांग लागली आहे. एका पेक्षा एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीजसाठी सज्ज आहेत. तप अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. एकीकडे एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'गदर 2' आणि OMG2 हे सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. तर दुसरी विजय देवरकोंडा आणि सामंथाचा खुशी हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात  विजय देवरकोंडा आणि सामंथा मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा या जोडीमुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा सिनेमा १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनेकदा हे दोन्ही कलाकार त्यांच्या पर्सन आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. कधी विजय देवरकोंडा रश्मिका मंदानासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो तर कधी सामंथा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी होणारी चर्चा जरा वेगळीच आहे. जे ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसू शकतो. यावेळी असं म्हटलं जातंय की, हे दोन्ही कलाकार सिनेमाच्या प्रमोशन करता-करता रिअल लाईफमध्येही एकत्र आले आहेत. हे आम्ही बोलत नसून विजय देवरकोंडाचे चाहते म्हणत आहेत. खरंतर विजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंन्टवरुन काही फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोच्या खाली अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, तु हिच्यासोबत लग्न कर. तर अजून एकाने लिहीलंय, की तुला रश्मिकाच सूट होते सामंथा नाही. तर अजून एकाने लिहीलंय, तुमचं हे प्री-वेडिंग शूट आहे का? तर अजून एकाने लिहीलंय, ओ माय गॉड या सुंदर जोडीला कोणाची नजर लागू नये. गोड कपल. तर अजून एकाने लिहीलंय, खरंच तुम्ही एकमेकांसोबत लग्न करणार आहात का? अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या दोघांच्या फोटोवर करत आहेत. तर अनेकांनी या फोटोवर हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजी शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

येत्या १ सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सामंथा आणि विजय देवरकोंडाला एकत्र स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काहीच शंका नाही. मात्र सध्या दोघांविषयी सुरु असलेल्या चर्चेत किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.