सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पहिल्यांदा शेहनाजचा ग्लॅमरस लूक चर्चेत

मोठ्या दुःखातून सावरतेय शेहनाज, दिसलं तिचं असं रूप...  

Updated: Nov 25, 2021, 01:45 PM IST
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पहिल्यांदा शेहनाजचा ग्लॅमरस लूक चर्चेत

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी दरी निर्माण झाली आहे. आज देखील सिद्धार्थचे चाहते त्याच्या निधनाचं दुःख विसरू शकले नाहीत. एवढंच नाही तर सिद्धार्थच्या निधनाने अभिनेत्री शेहनाज गिलला देखील मोठा धक्का लागला आहे. ती अद्यापही या मोठ्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज सोशल मीडिया आणि शुटिंगपासून दूर होती. पण आता तिने नव्याने कामाला सुरूवात केली आहे. 

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजने पहिल्यांदा ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी (Dabboo Ratnani) शेहनाजचे फोटो क्लिक केले आहे. एवढंच नाही तर डब्बूने त्याच्या सोशल मीडियावर शेहनाजचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शन देखील दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

डब्बू कॅप्शनच्या माध्यमातून म्हणाला, 'मान कायम उंच ठेवा आणि तुमचं हृदय मजबूत ठेवा...' सध्या डब्बूची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शेहनाजने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. शेहनाजच्या फोटोंवर कमेन्टचा  पाऊस पडत आहे. एवढंच नाही तर #SidNaaz हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे.