'काला करिकालन'मध्ये रजनीसोबत दिसणार मराठीमोळी अंजली पाटील

सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. रजनीकांत यांचा सिनेमा म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. आता त्यांच्या आगामी 'काला करिकालन' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतोय. या सिनेमाचं खास आकर्षण म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोझिट नाशिकची मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Updated: May 30, 2017, 04:14 PM IST
'काला करिकालन'मध्ये रजनीसोबत दिसणार मराठीमोळी अंजली पाटील title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या सिनेमाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. रजनीकांत यांचा सिनेमा म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. आता त्यांच्या आगामी 'काला करिकालन' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतोय. या सिनेमाचं खास आकर्षण म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोझिट नाशिकची मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमातील अंजलीच्या रोलबद्दल अजुन गुप्तता बाळगण्यात आली आहे. राधिका आपटेनंतर दुसरी मराठमोळी हिरोईन रजनीकांतच्या अपोझिट झळकणार असल्यामुळे साहजिकचं या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढलीय. अंजली याआधी प्रकाश झा यांच्या 'चक्रव्ह्यू' या सिनेमात दिसली होती. या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अंजलीने सगळ्यांचीच वाहवा मिळविली होती. सिनेमात अंजलीने नक्षलवाद्याची भूमिका केली होती. 

पदार्पणाच्या सिनेमातूनचं स्मिता पाटील यांच्याशी अंजलीची तुलना होतेय... पण अजून हवं तसं ग्लॅमर आणि वलयं अंजलीला प्राप्त झालेलं नाही. अंजलीनं मिर्झिया, दिल्ली डेज, श्री,किल द रेपिस्ट या सिनेमातही प्रमुख भूमिका केल्या आहेत. या बरोबरचं साऊथच्याही काही सिनेमांमध्ये अंजलीने काम केलंय. त्यामुळे साऊथ इंडस्ट्री अंजलीसाठी काही नवी नाही.

'कबाली' या सिनेमाचा दिग्दर्शक पी.रंजितच काला करिकालन या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. रंजितनेचं कबालीमध्ये रजीनीकांतच्या अपोझिट मराठमोळ्या राधिका आपटेला कास्ट केलं होतं... राधिकानेही मिळालेल्या संधीचं सोनं करत कबालीमध्ये तिची दखल घ्यायला लावली होती. एकीकडे अंजलीला ग्लॅमरने अजून हुलकावणी दिलीये तर दुसरीकडे राधिका आपटे आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे. नेहमीच हटके आणि बोल्ड रोल करणं हा राधिकाचा प्लस पॉईंट आहे. राधिका जेवढी बिनधास्त आहे तेवढीच अंजली साधी आहे. हेच या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचं वैशिष्ट्य आहे.

त्यामुळे 'थलाईवा'बरोबर काम करण्याचा ज्याप्रमाणे राधिका आपटेला फायदा झाला तसाच अंजलीला होतो का? तसेच हा सिनेमा अंजलीसाठी माईल्डस्टोन ठरु शकतो का? हे काला करिकालन हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरचं कळेल.