Ajay Devgn ची लेक अडकणार लग्नबंधनात? हातवर मेहंदी आणि चेहऱ्यावर गोड स्माईल...

जो काजोलने शेअर केला आहे. 

Updated: Jan 31, 2022, 01:49 PM IST
Ajay Devgn ची लेक अडकणार लग्नबंधनात? हातवर मेहंदी आणि चेहऱ्यावर गोड स्माईल... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण क्वचितच मुलांसोबत स्पॉट होतात. पण जेव्हाही ते कॅमेरासमोर येतातच सोशल मीडियावर त्यांची तुफान चर्चा होते. आता काजोल आणि अजयनंतर त्यांची लेक न्यासा देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिचे प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. 

अभिनेत्री काजोलने नुकताच शेअर केलेल्या एका फोटोमुळे सध्या न्यासाचीच सगळीकडे चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे न्यासाच्या हातावर मेहंदी चढली आहे. आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचं ग्लो दिसत आहे.

हा फोटो समोर येताच न्यासा देवगण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. न्यासाचा ट्रेडिशनल लूक पाहता तिला अनेक कमेंट येत आहेत.

पण न्यासाचा हा फोटो तिच्या मेहंदी समारंभाचा नाही. तिचा हा फोटो तिच्या एका जवळ्च्या व्यक्तीच्या विवाहसोहळ्यातील आहे.

जो काजोलने शेअर केला आहे. अभिनेत्री काजोल हीला कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी देत तिने मुलीचा फोटो शेअर केला. आणि त्याचं कारण ही काजोलने सांगितलं आहे.बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिची मुलगी न्यासाचा फोटो शेअर करताना कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी दिली आहे. काजोलने लिहिले, 'मी कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. 

पण रुडॉल्फ सारखे माझे नाक कोणी पाहू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून जगातील सर्वात सुंदर स्माईल पाहूया. पोस्टमध्ये काजोलने सांगितले की, ती तिची मुलगी न्यासाला खूप मिस करत आहे.त्यामुळे न्यासाच्या लग्नाची केवळ चर्चा आहे. आणि काजोलने शेअर केलेल्या फोटोपासून ही चर्चा सुरु झाली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x