50 वर्षीय ट्विंकल खन्ना होणार आई? म्हणाली 'मला खूप..'

ट्विंकल खन्ना गर्भधारणेच्या भीतीने त्रस्त आहे. वयाच्या 50 व्या वर्षी तिने स्वतः अशी पोस्ट केली होती. जिथे तिने सांगितले की तिची मासिक पाळी चुकली आहे. ही रजोनिवृत्ती आहे की आणखी काही असा प्रश्न तिला पडला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 21, 2024, 01:20 PM IST
50 वर्षीय ट्विंकल खन्ना होणार आई? म्हणाली 'मला खूप..' title=

Twinkle Khanna : अभिनेता अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टमधील कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने या पोस्टमध्ये मासिक पाळी चुकली आहे म्हटलं आहे. तिला गर्भधारणेची भीती वाटते आणि हे रजोनिवृत्ती आहे की नाही असा प्रश्नही तिने मांडला आहे. 

ट्विंकल खन्नाने एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिले, जेव्हा तुम्ही 50 वर्षांचे व्हाल. पीरियड्सही उशीरा येतात. कधीकधी तुम्हाला प्रश्न पडतो की हे रजोनिवृत्ती आहे की गर्भधारणा? यासोबतच तिची पोस्ट शेअर करताना ट्विंकल खन्नाने युजर्सना विचारले की, तुम्ही ५० वर्षांचे झाल्यावर रजोनिवृत्ती क्लबमध्ये सामील व्हा. या काळात काय होते? लक्षणे काय आहेत? ते सांगा.

अक्षय कुमार पुन्हा बाप होणार? 

ट्विंकल खन्नाच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमार तिसऱ्यांदा बाप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ट्विंकल खन्ना 50 व्या वर्षी बाळाला जन्म देणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. सध्या अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रजोनिवृत्ती म्हणजे काय? 

रजोनिवृत्ती या शब्दाचा अर्थ "मासिक चक्राचा शेवट" असा होतो. म्हणजे रजोनिवृत्ती ही स्त्रीची शेवटची मासिक पाळी असते. ग्रीक पॉज या शब्दापासून रजोनिवृत्ती हा शब्द आला आहे. ज्याचा अर्थ समाप्ती असा होतो. स्त्रीला जेव्हा सलग बारा महिने मासिक पाळी येत नाही त्यावेळी त्याला रजोनिवृत्ती येते असे म्हणतात. 

रजोनिवृत्तीची लक्षणे काय असतात? 

रजोनिवृत्तीमध्ये शारीरिक, भावनिक लक्षणेही दिसतात. जिथे महिलांना चिडचिड, दुःख, मूड स्विंग आणि अस्वस्थता यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

मासिक पाळी थांबण्याची लक्षणे :

अनियमित मासिक पाळी येणे, शरीरात दुखणे, स्तन दुखणे, निद्रानाश, खाजगी भाग कोरडे पडणे, सूज येणे आणि या काळात महिलांचे वजनही वाढू शकते.