अरूण गवळी आता 'डॅडी' नाही तर 'आजोबा'... अक्षय- योगिताच्या घरी चिमुकलीचं आगमन

लग्नाच्या वाढदिवसादिवशी मिळालं खास गिफ्ट 

Updated: May 11, 2021, 11:12 AM IST
अरूण गवळी आता 'डॅडी' नाही तर 'आजोबा'... अक्षय- योगिताच्या घरी चिमुकलीचं आगमन

मुंबई : अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे.  गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. (Akshay Waghmare and Yogita Gawli blessed with Baby Girl  ) लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर योगिताने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

अक्षय आणि योगिता यांच्या घरी तान्ह्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ७ मे रोजी दुपारी योगिताने मुलीला जन्म दिला. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहे, असं अक्षयने सांगितलं.

आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे, असंही अक्षयने म्हटलं आहे. 

दरम्यान, ​8 मे 2020 रोजी अक्षय व योगिता यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला होता. अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप या मराठी चित्रपटांमध्ये केलं आहे.