Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : सातासमुद्रापार लेकीला सोडून आलिया करतेय मज्जा?

Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : आलिया भट्टनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांची लेक राहा दिसली नाही म्हणून नेटकऱ्यांनी तिला आणि रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया आणि रणबीर पुढच्या महिन्यात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. 

Updated: Mar 27, 2023, 05:37 PM IST
Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : सातासमुद्रापार लेकीला सोडून आलिया करतेय मज्जा? title=

Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची जोडी ही लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. आलियाही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या आलियानं तिचे आणि रणबीरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलिया आणि रणबीरचे हे फोटो पाहिल्यानंतर त्या दोघांना सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करत आहेत. खरंतर आलिया आणि रणबीर लेक राहाला सोडून फिरायाला गेले आहेत त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

आलियानं तिचे आणि रणबीरचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. आलियानं नुकताच तिचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत लंडनमध्ये साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाचे फोटो आलियानं स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. लंडनमध्ये आलिया पती रणबीरसोबत फिरताना दिसत आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये कधी ती आणि रणबीर रस्त्यावर चालताना दिसत आहे. तर कधी सायकल चालवत आहेत. कधी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये आहेत तर कधी कोणत्या पार्कमध्ये. आलियानं तिची बहिणी शाहिन भट्टसोबत सुद्धा एक फोटो शेअर केला आहे.  आलियानं तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिच्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया ट्रोल

आलियाच्या या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'राहा म्हणत असेल अरे मला तर घ्या.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझं बाळ कुठे आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुला लाज वाटायला हवी... मुलीला आयाच्या भरोसे सोडून आलीस आणि इथे मस्त एन्जॉय करते. अशा आईला लाज वाटली पाहिजे जी मुलीला एकटं सोडून तिच्यासोबत वेळ व्यथित करण्याचे सोडून स्वत: मस्त फिरते.' तर काही नेटकऱ्यांनी आलियाची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'आलिया तू खूप सुंदर दिसतेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आलिया तू माझी आयकॉन आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माझ्यासाठी नेहमी तुचं सुंदर राहणार', अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी आलियाची स्तुती केली आहे. 

हेही वाचा : तुझ्यासारख्यांसाठी मी चित्रपट बनवत नाही; Manoj Bajpayee ला चित्रपटात न घेण्याचं यश चोप्रा यांनी सांगितलं कारण

दरम्यान, गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी रणबीर आणि आलिया हे लग्न बंधनात अडकले होते. पुढच्या महिन्यात त्या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. तर, आलिया ही लग्नाआधीच गर्भवती होती. लग्नाच्या काही दिवसांनंतर आलियानं तिच्या प्रेग्नंसीविषयी खुलासा केला होता. आलियानं नोव्हेंबर महिन्यात राहाला जन्म दिला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x