नवी दिल्ली : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर, अनेकांकडून चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि आलिया भट्टला (Alia Bhatt) सोशल मीडियावर सतत ट्रोल केलं जात आहे. सुशांतच्या चाहत्यांकडून या दोघांवर नेपोटिज्मचा (Nepotism) आरोप लावला जात आहे. याचदरम्यान आलिया भट्टच्या आगामी 'सडक 2' (Sadak 2) चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि ट्विटरवर लोक #Sadak2dislike अशा प्रकारचा हॅशटॅग वापरुन आलियाला पुन्हा ट्रोल करु लागल्याचं चित्र आहे.
This is the first time people are really showing that they are not just keyboard warriors...Never seen so much dislikes #sadak2dislike pic.twitter.com/X4ngwVgS83
— Rupesh Sonalkar (@rupeshsonalkar) August 12, 2020
So officially the most disliked video on YouTube in India and on number 14 in most disliked YouTube video in world Kudos to all of us keep reporting n disliking #Sadak2dislike #JusticeForSushant #dontdefamehinduculture pic.twitter.com/1m53iZL0F1
— fisheye (@fisheye81228348) August 12, 2020
12 ऑगस्ट रोजी 'सडक 2' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर त्याला केवळ 3 लाखांच्या आसपास लाईक केलं गेलं आहे. तर तब्बल 53 लाखहून अधिकांनी ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे. आलियाने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी, हा पहिल्याच असा चित्रपट आहे ज्याला लोकांनी सर्वाधिक नापंसती दर्शवली आहे. ट्रेलरला डिसलाईक केलं आहे.
'सडक 2' चित्रपट 28 ऑगस्ट रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.