ट्रोलिंग दरम्यान पूनम पांडे आणि करणवीर बोहरा यांनी पुन्हा केलं असं कृत्य, जाणून चाहत्यांना धक्का!

करणवीर बोहरा आणि पूनम पांडे यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Updated: Nov 3, 2022, 11:30 PM IST
ट्रोलिंग दरम्यान पूनम पांडे आणि करणवीर बोहरा यांनी पुन्हा केलं असं कृत्य, जाणून चाहत्यांना धक्का! title=

Poonam Pandey And Karanvir Bohra : आपल्या कातिल अदाने चर्चेत असणारी पूनम पांडे पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली आहे. गेल्या दिवसांत पुनम पांडे आणि अभिनेता करणवीर बोहराचं नवं गाणं रिलीज झालं आहे. 

या गाण्याच्या रिलीजच्या निमीत्ताने दोघांनी पापाराझींना पोज दिल्या होत्या, ज्यामुळे सोशल मीडियावर पूनम पांडे आणि करणवीर बोहराला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र ट्रोलिंग दरम्यान  पुन्हा एकदा दोघांनी काही असं केलं की, जे जाणून फॅन्सला शॉक लागला आहे. जाणून घेऊया  या दोघांनी नेमकं केलं करी काय?
 
आता काय केलं या जोडीने?
करणवीर बोहरा आणि पूनम पांडे यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये करणवीर बोहराने पूनम पांडेला आपल्या मांडीवर कसं उचलतो हे या व्हिडिओत  स्पष्टपणे दिसत आहे. तिला उचलून घेताच पूनमने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि यादरम्यान तिला आपलं हसूही आवरता आलं नाही, तर करणवीर काहीतरी बोलताना दिसत आहे.

यानंतर पूनम पांडेनेही करणवीरच्या गळ्यात हात घातला. याआधीही दोघांना सोशल मीडियावर खूप ट्रोलचा सामना करावा लागला आहे. ट्रोल झाल्यानंतरही दोघींनी पुन्हा एकदा आपला स्वभाव दाखवायला मागे हटले नाही, उलट ते दोघंही त्या क्षणाचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता काही दिवसांपुर्वी पूनम पांडे आणि करणवीर बोहरा आपलं नवीन गाण्याला घेवून खूप चर्चेत होता. यानंतर करणवीरने पूनम पांडेला उचलून घेतल्यावर पुन्हा एकदा ही जोडी लाइमलाईटमध्ये आली आहे.