अज मैं मूड बना लेया.... नवीन गाण्यापेक्षा Amruta Fadnavis यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. मात्र, या नविन गाण्यापेक्षा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा होत आहे. लवकरच हे गाण प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Jan 2, 2023, 04:23 PM IST
अज मैं मूड बना लेया.... नवीन गाण्यापेक्षा Amruta Fadnavis यांच्या इंडो वेस्टर्न लूकचीच जास्त चर्चा title=

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवीन वर्षातील नवं गाण लवकरचं त्यांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस यांनी स्वत:  सोशल मीडियावर एक पोस्ट  (Devendra Fadnavis)  शेअर करुन या गाण्याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. मात्र, या नवीन गाण्यापेक्षा अमृता फडणवीस यांच्या इंडो वेस्टर्न लुकचीच जास्त चर्चा होत आहे. लवकरच हे गाण प्रदर्शित होणार आहे. 

"अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!" असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातील अमृता यांचा लुक कसा असेल याची एक झलक अमृता यांनी पोस्टमध्ये लिहीली आहे. येत्या 6 जानेवारीला 'टी सीरिज'चं हे गाणं प्रदर्शित होणार आहे. 

अज मैं मूड बना लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे !! An electrifying , Biggest Bachelorette Anthem of the Year …… अस कॅप्शन अमृता यांनी या पोस्टला दिले आहे. या कॅप्शनमध्येच सारं काही आलं आहे.  हे नवीन गाणं बॅचलर्सवर आधारित असल्याचे पोस्टवरुन स्पष्ट होत आहे. या गाण्यात अमृता यांचा अत्यतं हटके लूक पहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांची या  गाण्याबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 
 

अमृता फडणवीस यांना गाण्याची आवड

यापूर्वी जुलै 2022 मध्ये अमृता फडणवीस यांचे  ‘वो तेरे प्यार का गम! (Woh Tere Pyar Ka Gham ) हे गाण प्रदर्शित झाला होत. पावसाच्या या दर्दी मौसममध्ये आलेल्या या गाण्यात देखील अमृता यांचा वेगळाच लुक पहायला मिळाला होता. 

अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आणि आवड दोन्ही आहे. त्या लव्ह आणि पार्टी साँगसह वेगवेगळ्या विषयांवर गाणी बनवत असतात.  सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर  केली आहेत. अमृता फडणवीसांनी संगीत क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  त्यांच्या गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांनी आपली गाण्याची आवड जपली आहे.  फॅशनच्या बाबतातही त्या आपल्या विशेष  व्यक्तिमत्व टिकवून आहेत. अमृता फडणवीस या सोशल मिडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. त्या आपल्या अनेक इव्हेंट्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.