Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर म्हणतेय नशिबात असेल तर पुन्हा भेटू, नेमकं झालंय काय ?

काल पर्वा सगळं आलबेल होतं मग असं अचानक अमृता खानविलकरने इतका मोठा निर्णय घेतळ्यामुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे. चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे 

Updated: Mar 6, 2023, 03:33 PM IST
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर म्हणतेय नशिबात असेल तर पुन्हा भेटू, नेमकं झालंय काय ?  title=

Amruta Khanvilkar  : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आपल्या नृत्यशैलीने आणि अभिनयाने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वाजले कि बारा या लावणीतून तिने अख्ख्या महाराष्ट्राला नाचायला लावलं. नुकताच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा ही लावणीसुद्धा खूप प्रसिद्ध झाली. या गाण्यातील अमृता खानविलकरचा डान्स आणि हावभाव सर्वच अंगाई झकास होत. अप्रतिम नृत्याने अमृताने संपूर्ण महाराष्ट्रावरभुरळ पाडली होती.     

पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे अमृता चर्चेत आहे. अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे भरपूर फॉलोवर्स आहेत पण तिच्या एका निर्णयामुळे अमृताच्या फॅन्सना धक्का बसला आहे. अमृताने हा निर्णय का घेतला असेल याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर पोस्ट करून, ''नशिबात असेल तर पुन्हा भेटू'' असं लिहीत गुडबाय देखील केलंय.   

त्याच झालं असं की, अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून (instagram) कायमची एक्झिट घेतलीये. एक पोस्ट शेअर करत तशी माहिती तिने चाहत्यांना दिली आहे. ( (Amruta Khanvilkar Share Post About taking break from social media))

अमृता नेहमीच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिच्या सर्व पोस्टना खूप लाईक्स आणि कंमेंट्स मिळत असतात. थोडेथोडके नाही तर इंस्टाग्रामवर तिचे तब्बल ३.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. मराठी सेलिब्रिटींच्या यादीत अमृता सर्वाधिक फॉलोवर्स (instagram followers) असणारी अभिनेत्री आहे. सिनेमे असो किंवा पर्सनल आयुष्याबद्दल गोष्टी असो इंस्टग्रामवर अमृता आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. मात्र तिने अचानक इतका मोठा निर्णय का घेतला हा प्रश्न सर्वानाच पडलेला आहे. 

अमृताने काय पोस्ट केलंय ? 

अमृताने 14  तासांपूर्वी एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. त्यातच तिने आपण इंस्टाग्रामपासून ब्रेक घेत आहोत असं म्हटलंय. तिने या पोस्टमध्ये लिहिलंय, "लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेल... परत येण्यासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा आहे". "लवकरच पुन्हा भेटू... गुडबाय... मी ब्रेक घेत आहे".  (Amruta Khanvilkar)

अमृताने सोशल मीडियावर ब्रेक घेत असल्याचं सांगताच चाहत्यांमध्ये मात्र नाराजी दिसून येत आहे. लोकांनी तिची विचारपूस केलीये , काहींनी तर सरळ घटस्फोट घेत आहेस का असं देखील विचारलं आहे, तर काही चाहत्यांनी काळजी घे असं बोललं आहे. तर काही फॅन्सनी तिच्या तिच्या निर्णयाचं कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  (Amruta Khanvilkar)

अमृताचे अपकमिंग प्रोजेक्ट्स 

अमृताचा ''ललिता शिवाजी बाबर'' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात माणदेशी एक्स्प्रेस धावपट्टू ललिता बाबर यांच्या जीवनावर आधारित भूमिका ती साकारत आहे.   (Amruta Khanvilkar Share Post About taking break from social media)