'बिग बॉस 15'च्या चर्चांवरुन का भडकली अंकिता लोखंडे ?

दरम्यान अंकिता लोखंडे सध्या निर्माती एकता कपूरसोबत 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेच्या सिक्वलवर काम करतेय. यात ती पुन्हा एकदा अर्चनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 

Updated: Jun 28, 2021, 01:18 PM IST
 'बिग बॉस 15'च्या चर्चांवरुन का भडकली अंकिता लोखंडे ? title=

 मुंबई : 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे  अभिनेत्री अंकिता लोखंडे घरघरात पोहोचली. या मालिकेतील अर्चानाच्या भूमिकेमुळे तिने सर्वांचीच मनं जिंकली. त्यानंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये अंकिता सर्वांत जास्त चर्चेत राहिली होती. पण त्यानंतर अंकिताने आपण बॉयफ्रेंड विकी जैनला डेट करत असल्याचं सोशल मीडियाद्वारे जगजाहीर करुन टाकलं. दोघांचे फोटोज ती बऱ्याचदा शेअर करताना दिसते.

 मात्र गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे तिच्या पर्सनल लाईफमधील घडामोडींमुळे नव्हे, तर 'बिग बॉस'च्या 15 व्या पर्वामुळे चर्चेत आहे. तिला बिग बॉसच्या आगामी सीजनसाठी विचारणा करण्यात आल्याच्या बातम्या होत्या.त्यात आता अंकिताने पुढे येत  स्वत: यावर प्रतिक्रिया दिलीये. अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने 'बिग बॉस’मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

या पोस्टमध्ये अंकिता लिहते, "अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये अशा बातम्या येऊ लागल्या आहेत की मी यावर्षी ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी होणार आहे. मला वाटतं मीडिया आणि सर्वांनी हे नोट करावं की मी बिग बॉस या शोमध्ये सामील होणार नाही. या शोमध्ये मी सहभाग घेणार असल्याचं वृत्त खोटं आहे. मी अशा कोणत्याच गोष्टीचा भाग होणार नसतानाही लोकांनी लगेचच घाई करत मला द्वेषपूर्ण प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय. "

दरम्यान अंकिता लोखंडे सध्या निर्माती एकता कपूरसोबत 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेच्या सिक्वलवर काम करतेय. यात ती पुन्हा एकदा अर्चनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.