क्रिकेट टीमचा मालक झाला अक्षय कुमार, पाहा कोणता संघ विकत घेतला!

बॉलिवूडचा खिलाडी कुमार नेहमीच सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नेहमीच तो त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशल आयुष्यातील सगळे अपडेट्स त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो.

Updated: Dec 12, 2023, 07:30 PM IST
क्रिकेट टीमचा मालक झाला अक्षय कुमार, पाहा कोणता संघ विकत घेतला! title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार नेहमीच सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नेहमीच तो त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशल आयुष्यातील सगळे अपडेट्स त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. मात्र नुकतीच अक्षयने एक आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे. सिनेमात हिरोम्हणून दिसणारा अक्षय आता क्रिकेट टीमचा मालक बनणार आहे. अक्षय कुमारच्याआधी बरेच बॉलिवूड कलाकारांची क्रिकेट टीम आहे. याची घोषणा करत खिलाडी कुमारने एक मोठी पोस्ट अभिनेत्याने लिहीली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

क्रिकेट टीमचा मालक बनला अभिनेता अक्षय कुमार
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहीलं की, 'श्रीनगरमध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा नवीन संघ खरेदी केला आला आहे. ही आपल्या प्रकारची पहिली टेनर बॉल T10 क्रिकेट स्पर्धा आहे. 2 मार्च ते 9 मार्च 2024 या कालावधीत स्टेडियममध्ये खेळला जाईल. ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, 'मी ISPL आणि श्रीनगर संघाचा भाग होण्यासाठी उत्साहित आहे. ही स्पर्धा क्रिकेट जगतात गेम चेंजर ठरू शकते.

या वर्षी रिलीज झालेला सिनेमा
अक्षय कुमारचे यावर्षी ३ सिनेमा रिलीज झाले आहे. एक  'सेल्फी' जो यावर्षी फेब्रुवारमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमात अक्षयसोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. खिलाडी कुमारला या सिनेमाकडून खुप अपेक्षा होत्या मात्र हा सिनेमा काही फारशी कमाल करु शकला नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.  यानंतर 'OMG 2' रिलीज झाला मात्र हा सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट झाला.  आणि अक्षयला नवी आशा मिळाली. यानंतर काही काळापूर्वी 'मिशन राणीगंज' रिलीज झाला. या सिनेमालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लवकचरच अक्षयचा  'बड़े मियां छोटे मियां' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या आगामी सिंघम अगेन या सिनेमात झळकणार आहे. याचबरोबर त्याच्याकडे वीर पहाडीयाचा स्काय फोर्सही आहे. २०२३ हे वर्ष अक्षयसाठी खूप चांगलं वर्ष होतं. अनेक प्रोजक्ट अक्षयचे हिट झाले.