Anu Aggarwal On Her Married: 90 दशक म्हणजे 'गोल्डन ज्युबली' या काळात अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीस आले, जे आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. त्यांपैकी एक सिनेमा म्हणजे 'आशिकी'... 'आशिकी' सिनेमातील किस्से आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यामुळे कोणत्याही खास कार्यक्रमांमध्ये अशा हीट सिनेमाच्या कलाकारांना आमंत्रण देण्यात येतं. नुकताचं 'आशिकी' सिनेमाची टीम इंडियन आयडल शोमध्ये पोहोचली. यावेळी 'आशिकी' फेम आभिनेत्री अनू अग्रवालने (Anu Aggarwal) तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं.
अनू म्हणाली, 'अनेक वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. आमचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं. पण आमच्या नात्याला एक वेगळं वळणावर गेलं. त्याला पुन्हा प्रेम झालं... म्हणून आम्ही विभक्त झालो...' (Anu Aggarwal On Her Married)
पुढे अभिनेत्रीला विचारला, पहिला बॉयफ्रेंड गेल्यानंतर कधी लग्नाचा विचार केला नाही? यावर अभिनेत्री म्हणाली, 'माझं नातं अपयशी झाल्यानंतर मला कळालं आपल्यावर प्रेम करण्यासाठी दुसऱ्याची काय गरज? स्वतःमध्ये प्रेम शोधण्याची मला गरज होती. आता मी अनेक लग्न समारंभासाठी जाते, तेव्हा नवीन जोडप्याला शुभेच्छा देते...' (Anu Aggarwal love life)
इंडियन आयडल शोमध्ये अनू दर्शवली नाराजी
सिंगिंग रिऍलिटी शो 'इंडियन आयडल'बाबत नवा वाद समोर आला आहे. अनु अग्रवाल रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांवर नाराज आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आशिकी स्पेशल एपिसोडमध्ये सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. (anu aggarwal foundation)
पण एपिसोडमधून माझे अनेक सीन (aashiqui song) कट करण्यात आल्याचे आरोप अनु अग्रवालने केले आहेत. सध्या या प्रकरणामुळे 'आशिकी' फेम आभिनेत्री अनु अग्रवाल चर्चेत आली आहे.