Sacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका

Anurag Kashyap Daughter Aliyah Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया कश्यपच्या साखरपुड्याची. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रपोजची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिचे साखरपुड्याचे फोटोज बाहेर आले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 4, 2023, 11:42 AM IST
Sacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका  title=
August 4, 2023 | anurag kashyap daughter aaliyah kashyap engagement photos goes viral (Photo: Instagram)

Anurag Kashyap Daughter Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनुराग कश्यपच्या लेकीच्या साखरपुड्याची. काहीदिवसांपुर्वी आपल्या बॉयफ्रेंडनं केलेल्या प्रपोजला तिनं होकार दिला होता आणि सोबतच तिनं आपले हे फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं होते. ऑस्ट्रेलियातील तिच्या बॉयफ्रेंडसह तिनं काल आपला शाही साखरपुडा केला आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अशावेळी तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तिच्या या प्रपोझच्या फोटोंनंतर अनुराग कश्यपचीही एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले होते. त्यावेळी अनुराग कश्यप हे कान्समध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिथे गेले होते. तेव्हा त्यांचा 'केनेडी' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता. सनी लिओनी ही या चित्रपटातून समोर आली होती. 

त्यावेळी आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च कसा भागणार यावर त्यांनी मार्मिक अशी पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. त्यातून आता अनुराग यांच्या लेकीचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी आलिया कश्यप ट्रेडिशनल लुकमध्ये दिसली होती. तिनं पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि चोळी घातली होती. तिच्या फियानसेनेही तिच्यासारखाच ट्विनिंग लुक कॅरी केला होता. त्यामुळे ते दोघंही यावेळी एकमेकांना सुट होत होते तिच्या देसी लुकच्या तडक्यानं सर्वांनाच घायाळ करून सोडले आहे. त्यामुळे तिच्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. अनुराग कश्यप हे लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

हेही वाचा - चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय सुपरस्टारचा जलवा, दिसायला हॅण्डसम हंक... बॉलिवूड अभिनेत्यांनाही टक्कर

यावेळी 'द आर्चिज'ची संपुर्ण टीमही हजर होती. त्यांनीही आपल्या खास मैत्रीणीच्या साखरपुड्यासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. सुहाना खाननं निळ्या रंगांची साडी नेसली होती. त्याचसोबतच अगस्त्या नंदानंही हजेरी लावली होती. तो व्हाईट शेरवानीमध्ये आला होता. तर खुशी कपूरनंही यावेळी गुलाबी रंगाची साडी नेसून चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. अशावेळी आता चांगलीच चर्चा रंगली आहे ती म्हणजे स्टारकीड्सची. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुराग कश्यपनंही यावेळी ब्लॅक रंगाचा शेरवानी जॅकेट लुक कॅरी केला होता. तेव्हा त्याच्या लुकीचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी अनुराग कश्यपच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीनंही मुलीला कडेवर घेत भरजरी साडी नेसत आपल्या पार्टनरसोबत हजेरी लावली होती.