'फाईल नं 323' पुन्हा उघडणार; Vijay Mallya चं बिंग अखेर फुटणार

भारताला लुटून विजय मल्ल्याची परदेशातील 'ऐश' लवकरच सर्वांसमोर  

Updated: Nov 8, 2022, 07:37 AM IST
'फाईल नं 323' पुन्हा उघडणार; Vijay Mallya चं बिंग अखेर फुटणार title=

Anurag Kashyap as Vijay Mallya: सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेकांच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेक गुंड आणि डॉन यांचे जीवनपट दिग्दर्शक आणि लेखकांनी मोठ्या पडद्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता भारताला लुटणाऱ्या कर्जबुडव्या विजय माल्ल्याचा (Vijay Mallya) जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विजय मल्ल्याच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचं नाव 'फाईल नं 323' (File No 323) असं असणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन तामिळमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांना असिस्ट करणार कार्तिक करणार आहे. 

'फाईल नं 323' सिनेमा

'फाईल नं 323' सिनेमातून कार्तिक दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.  (vijay mallya house) महत्त्वाचं म्हणजे सिनेमात विजय माल्ल्याची भूमिका साकारण्यासाठी कार्तिक दिग्दर्शक अनुराग कश्यपची निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुराग लवकरच फाईल नं 323 सिनेमी साईन करणार आहे.  (vijay mallya kingfisher)

सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे, कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या आयुष्यावर अधारित फाईल नं 323 सिनेमा 2023 वर्षांतील सर्वात बिग बजेट सिनेमा असणार आहे. सिनेमाचा बजेट मोठा असल्यामुळे अनेक मोठ्या कलाकारांची मेजवानी प्रेक्षकांना एका पडद्यावर पाहाता येणार आहे.(vijay mallya, son)

सिनेमाचं शुटिंग युरोप आणि भारतातील काही भागांमध्ये होणार आहे. शिवाय विजय मल्ल्या परदेशात किती एशो-आरामात जीवन जगत आहे, हे देखील सिनेमातून कळणार आहे. म्हणून सिनेमा नक्की कसा असेल आणि विजय मल्ल्याच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुसाला सिनेमातून होणार आहे. (vijay mallya net worth)

बॅड बॉय बिलियनेअर्स

दरम्यान, नेटफ्लिक्सने एका डॉक्युमेंट्रीमध्ये विजय मल्ल्या, सुब्रत रॉय आणि नीरव मोदी यांचा जीवनपट दाखवला. बॅड बॉय बिलियनेअर्स (Bad Boy Billionaires) नावाच्या डॉक्यूमेंट्रीमध्ये विजय मल्ल्या, सुब्रत रॉय आणि नीरव मोदी यांनी फसवणूक करून भारतातील अब्जाधीशांच्या यादीत एका रात्रीत कसे सामिल झाले, हे दाखवण्यात आलं. (where is vijay mallya now 2022)