अरबाज खानच्या गर्लफ्रेंडसोबत घडला धक्कादायक प्रकार; कॅमेरात व्हिडिओ कैद

जॉर्जियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Dec 11, 2022, 05:26 PM IST
अरबाज खानच्या गर्लफ्रेंडसोबत घडला धक्कादायक प्रकार; कॅमेरात व्हिडिओ कैद title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान ( Arbaaz Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अरबाज पत्नी मलायका अरोराला (malaika arora) घटस्फोट दिल्यानंतर आता इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत (giorgia andriani) रिलेशनशिपमध्ये आहे.  अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियामुळे नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

दुसरीकडे, जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. जॉर्जिया जेव्हा फोटो शेअर करते की तेव्हा काही मिनिटांत ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता अरबाजपेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या जॉर्जिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण जाणून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

जॉर्जियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओत अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी नुकतीच एका मोठ्या दुर्घटनेतून बचावल्याचं दिसत आहे. रोड क्रॉस करताना ती दोन गाड्यांच्या मध्ये आली आणि जॉर्जिया पुढे जाणार इतक्यात तिला समजलं की गाडी पार्क असलेली गाडी मागे येत आहे.

 तेवढ्यात जॉर्जिया गाडीच्या डिक्कीवर जोरात हात मारते. त्यामुळे गाडीत बसलेल्या चालकाला मागे कोणीतरी असल्याचं समजतं. यानंतर ड्रायव्हर तात्काळ ब्रेक लावतो ज्यामुळे जॉर्जिया जखमी होण्यापासून बचावते. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सनी मलायकाच्या नावाने जॉर्जियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरबाज खान 22 वर्षांनी मोठा
अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी ही जोडी खूप लाइमलाइटमध्ये राहते. फार कमी लोकांना माहित असेल की अरबाज जॉर्जियापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे. अरबाज खान 54 वर्षांचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी 32 वर्षांची आहे.

अरबाजने 1998 मध्ये मलायका अरोरासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. दोघांना 20 वर्षांचा मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव अरहान खान आहे. 19 वर्षे लग्नबंधनात राहिल्यानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2016 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली आणि 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटाला अधिकृत मान्यता मिळाली. मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे आणि ते गेल्या 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दुसरीकडे मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.