Salman Khan चा थोरला भाऊ अरबाझ खानचं Shah Rukh Khan बाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...

Arbaaz Khan नं छोट्या पडद्यावर हा मोठा खुलासा केला आहे. 'द इनविसिबल्स विद अरबाज खान' या शोमध्ये अरबाजनं हा खुलासा केला आहे. अरबाजच्या या शोवर त्यानं शाहरुखची तुलना ही सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे.

Updated: Feb 27, 2023, 06:41 PM IST
Salman Khan चा थोरला भाऊ अरबाझ खानचं Shah Rukh Khan बाबत मोठं वक्तव्य, म्हणाला... title=

Arbaaz Khan Talk About Shah Rukh Khan : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक असला, तरी त्याचा भाऊ अरबाज खानला (Arbaaz Khan) सलमानसारखं यश मिळवू शकला नाही. अरबाजला चित्रपटसृष्टीत यश मिळालं नाही. हे पाहिल्यानंतर त्यानं छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. अरबाजनं त्याचा 'द इनविसिबल्स विद अरबाज खान' हा शो सुरु केला. या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरबाज भाऊ सलमान खानचा चांगला मित्र शाहरुख खानविषयी (Shahrukh Khan) एक मोठं वक्तव्य करताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अरबाजनं शाहरुखचं नाव न घेता त्याच्या सुत्रसंचलनाच्या स्किलवर प्रश्न केला आहे. 

अरबाजच्या या शोमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात चित्रपटसृष्टीतल दिग्गज सेलिब्रिटी हेलन आणि जावेद अख्तर यांचा देखील समावेश होता. शोमध्ये अरबाज शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना पाहिजे ते सगळे प्रश्न विचारताना दिसतो. त्यापैकी एका मुलाखतीत अरबाज शाहरुखच्या सुत्रसंचालनावर बोलताना दिसतो. अरबाज म्हणाला, सलमान खाननं दस का दमनं बाऊंस केलं आणि अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीला खूप चांगल्या प्रकारे होस्ट केलं. या शोनंतर त्या दोघांचे चित्रपटसृष्टीतील करिअर देखील खूप चांगल्या प्रकारे सुरु झाले, मात्र, शाहरुख तसं करू शकला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अरबाज म्हणाला की, 'असं वाटतं की शाहरुख खान त्यांच्यात असलेला चांगुलपणा छोट्या पडद्यावर दाखवू शकले नाही. मला वाटतं की प्रेक्षकांना तो (Fake) म्हणजेच खोटेपणा दिसला असेल. सत्य तर हे आहे की तुम्ही छोट्या पडद्यावर फेक नाही राहू शकतं किंवा मग तुम्हाला अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्यासारखे स्मार्ट राहणं गरजेचं आहे. अमिताभ हे प्रेक्षकांना ओळखतात. मात्र, शाहरुख असं नाही करू शकत.' शाहरुख जेव्हा शोचा सुत्रसंचालक झाला तेव्हा अनेकांनी हा शो पाहणं बंद केलं होतं. 

हेही वाचा : Siddharth Chandekar च्या पत्नीचा आंघोळ करतानाच फोटो समोर, पतीची रिअ‍ॅक्शन पाहून चाहते थक्क

दरम्यान, शाहरुख हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक रेकॉर्ड ब्रेक केले आहे. खरंतर या चित्रपटातून शाहरुख तब्बल 4 वर्षांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.