मुंबई : भारतामध्ये अॅक्शन फिल्म्सचा खास प्रेक्षक आहे. नुकताच रीलिज झालेला 'बागी 2' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच आता हॉलिवूडच्या एका चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार एन्ट्री घेतली आहे.
अनेक सुपरहिरोजनी सजलेल्या 'अव्हेजर्न्स : इन्फिनिटी वॉर' या सिनेमाने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशीच या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर उत्तम ओपनिंग मिळाले आहे. सुमारे 2000 स्किन्सवर रीलिज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 .30 कोटींची कमाई केली आहे.
30 मार्चला रीलिज झालेल्या ' बागी 2' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 25.10 कोटींची कमाई केली होती. मात्र नुकत्याच रीलिज झालेल्या अव्हेंजर्सने इंग्लिश आणि डब व्हर्जनमध्ये मिळून 31 कोटींचा गल्ला जमावला आहे.
East. West. North. South... It’s #AvengersInfinityWar wave across the country... Fri ₹ 31.30 cr. India biz NettBOC... GrossBOC: ₹ 40.13 cr... Sets a NEW BENCHMARK for Hollywood films in India... #Avengers #InfinityWar
— taran adarsh (@taran_adarsh) April 28, 2018
पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा अव्हेजर्स हा पहिला हॉलिवूड सिनेमा ठरला आहे. यानंतर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून अव्हेजर्स या चित्रपटाने इतर हॉलिवूड सिनेमांसाठी भारतामध्ये नवा बेंचमार्क रचल्याचं मत व्यक्त केलं आहे.
मागील दहा वर्षात मार्वलचे 18 चित्रपट आले. त्यापैकी काहींमध्ये कहाणी पुढे सरकली तर काहींमध्ये कहाणीचा शेवट झाला. आता पुढे काय ? ही उत्सुकता ताणून ठेवण्यात चित्रपटाची टीम यशस्वी ठरली आहे. 'अवेंजर्स इंफिनिटी वॉर' या चित्रपटामध्ये 67 लीड अॅक्टर्स आहेत. त्यामुळे नेमका कोणता सुपरहिरो मरणार ? या बाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.